आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:आपली सर्व ऊर्जा स्वसुधारणेसाठी खर्च करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणीतरी प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ज्ञ पास्कलला म्हणाला, ‘जर माझ्याकडे तुझा मेंदू असता तर मी चांगली व्यक्ती असतो.’ पास्कलने उत्तर दिले, ‘चांगली व्यक्ती व्हा आणि तुमच्याकडे माझा मेंदू असेल.’ ‘होणे’ हे ‘करण्या’च्या आधी यावे. हाच यशाचा क्रम आहे. म्हणजे काही चांगले करण्यापूर्वी वास्तविक चांगले बनले पाहिजे. मात्र, आमचा क्रम उलटा आहे. आम्ही महान कामे साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतो, पण पायाची उपेक्षा करतो. स्वत: उत्तमातील उत्तम माणूस होत जाणे हाच पाया आहे. आपण स्व-सुधारणेला प्राधान्य दिले तर बाह्य कामांतही अधिक यश मिळेल.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७ दशकांपेक्षा अधिक काळ झाला. या काळात सरासरी उत्पन्न ७०० टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, आज लोक जास्त आनंदी असल्याचे तुम्ही कधी एेकले आहे? एकदम उलट! मी जो डेटा गोळा करून मूल्यांकन करू शकलो त्यानुसार आनंदी राहणाऱ्यांची संख्या अर्धी झाली आहे; किशोरवयीनांच्या आत्महत्येचा दर तीनपट झाला आहे, तणावाचा दर चौपट आणि घटस्फोटाचा दर पाचपट वाढला आहे. आपण सर्वच आनंदासाठी धावत तर आहोतच, पण विरुद्ध दिशेने आनंद शोधत आहोत. लोक आपल्या जीवनात बाह्य गोष्टींवरून चिडतात-ओरडतात, असे का होते! आनंदासाठी नोकरी, घर, मित्र बदलतात. मात्र, स्वत:मध्ये बदल करण्याचा कधीच विचार करत नाहीत. एकदा मी अमेरिकेतील डेनव्हर, कोलोरॅडोत व्याख्यानासाठी गेलो. तेथील रॉकी पर्वत खूप सुंदर आहेत. एकदा सकाळी मी आपल्या सत्संगींसोबत ‘पाइक्स पीक’वर जात होतो. हे शिखर १४ हजार फूट उंचीवर आहे. सभोवताली फक्त खडक-वाळलेल्या मातीचे आवरण. तितक्यात अचानक माझी नजर मध्येच फुललेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. त्या कोरड्या हवामानात हे फूल आपल्या सर्व सामर्थ्यासह फुलले होते. आपल्या रंगीत व अनन्यसाधारण उपस्थितीसह ते जमिनीच्या नापिकीला आव्हान देत होते. जिथेही त्याची बीजे पडली तिथे ते फूल फुलले. या छोट्याशा रोपाने तिथे अनेक आव्हानांचा सामना केला असावा. मात्र, तरीही ते फुलण्यात यशस्वी ठरले. त्याने मला विचार करण्यास भाग पाडले की, ‘आपण जीवनात जिथे आहोत तिथूनच का फुलू शकत नाही?’

यासाठी संत सूरदासांचे जीवन प्रेरणा देते. ते जन्मत: अंध होते. ईश्वर-गुरूंच्या कृपेने त्यांना दिव्य दृष्टी मिळाली. परिणामी त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांची छाप पडली. आपल्या जीवनकाळात त्यांनी ईश्वराची महिमा गात एक लाख कविता लिहिल्या. त्यांनी आव्हानांची सोबत करून प्रतिभा फुलू दिली. जीवनाला त्यांनी ईश्वरीय दृष्टिकोनाशी जोडून ठेवले. आम्हाला एक प्रगत माणूस म्हणून विकसित करणे, हा त्याचा सार आहे.

आपण आपल्या स्वार्थी सुखाच्या मागे आपला सभोवताल बदलण्यात गुंग असतो, पण आम्हाला बदलण्यात, पूर्ण बनवण्यात ईश्वराची रुची आहे. दुर्दैवाने आपण आयुष्यभर स्व-सुधारणेऐवजी इतर शंभर कामांना प्राधान्य देतो. एका वर्षात आपण स्व-सुधारणेसाठी किती वेळ देतो? निश्चितच आपण शिक्षण-नोकरीत खूप कष्ट केले पाहिजेत, पण स्वत:वर त्याहीपेक्षा जास्त मेहनत घेतली पाहिजे. आपला आंतरिक विकासच बाह्य यशाचा पाया आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आपण परिस्थितीनुरूप चांगले बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या संपूर्ण शारीरिक-मानसिक क्षमता स्वत:ला उत्तम बनवण्यावर केंद्रित असतात. जितकी जास्त आपण स्वत:मध्ये सुधारणा करू तितकीच प्रेरणा जीवनातील सर्व कामे सर्वोत्तम करण्यासाठी मिळेल. जेव्हा कामात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यासाठी आपल्याला स्वत:ला आणखी उत्तम बनवण्याची गरज आहे. अशाप्रकारे योग्य आकलनासह ‘चांगले होणे’ आणि ‘चांगले करणे’ एकमेकांना बळकटी देत राहतात. यानंतर स्वाभाविक परिणाम म्हणून बाह्य यश, उच्च चेतना खुलणे, महान मूल्यांच्या शृंगार-संतुष्टीच्या गहन भावनेचे अनुसरण होत राहते. त्यामुळे सुखी आयुष्य जगण्यासाठी या सोप्या मंत्राचा अवलंब करा... चांगले व्हा, चांगले करा आणि अशाप्रकारे स्वत:ला चांगली जाणीव होऊ द्या.

- यूट्यूब: SwamiMukundanandaHindi/channels - ट्विटर: @Sw_Mukundananda

स्वामी मुकुंदानंद आध्यात्मिक गुरू आणि लेखक

बातम्या आणखी आहेत...