आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:जिथे तरुण-खर्च करणारे ग्राहक आहेत तिथे व्यवसाय सुरू करा

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यामध्ये भारताने दोन पुरस्कार जिंकले तो ९५ वा ऑस्कर हा तिसरा सर्वात कमी पाहिला गेलेला ऑस्कर सोहळा होता. तरीही त्याचे निर्माते एबीसी अधिकारी सुटकेचा नि:श्वास सोडू शकतात, कारण या सोहळ्याला रविवारी १.८७ कोटी लोकांना टीव्हीवर आणण्यात यश आले, सलग दुसऱ्या वर्षी प्रेक्षकांत वाढ झाली. २०२१ मध्ये १.४ कोटी लोकांनी हा सोहळा पाहिला, त्याने संपूर्ण मनोरंजन उद्योगाला सतर्क केले. गेल्या वर्षी १.६६ कोटी प्रेक्षकांनी तो पाहिला होता. २०१८ पूर्वी प्रेक्षक संख्या ३.२ कोटींपेक्षा कमी कधीच नव्हती. जाहिरातदारांसाठी प्रेक्षकसंख्या महत्त्वाची आहे. यामुळेच यावर्षी अॅकॅडमी अवॉर्ड््समध्ये लेटरबॉक्स्ड आणि सोशल मीडिया साइट्स टिकटॉक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या नवीन मार्केटिंग भागीदारांवर जाहिरात वाढवली आहे. याशिवाय त्यांना हे समजले की, १.५ अब्ज डाॅलर कमाई करणाऱ्या ‘टॉप गन मॅव्हरिक’ आणि २.३ अब्ज डाॅलर कमाई करणाऱ्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’सारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी नामांकनांमुळे प्रेक्षकसंख्या वाढेल, तथापि त्याला पुरस्कार मिळाला नाही. आणि ते बरोबर होते.

हे सूत्र केवळ आंतरराष्ट्रीयच नव्हे तर देशांतर्गत बाजारपेठेतही लागू आहे. हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांचे निर्माते आणि वितरक आनंद पंडित यांचेच उदाहरण घ्या, त्यांनी आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. त्यांचा स्वातंत्र्यपूर्व आणि १९८० च्या दरम्यानचा काळ दाखवणारा पहिला कन्नड अॅक्शन चित्रपट ‘अंडरवर्ल्ड का कब्जा’ शुक्रवारी जागतिक स्तरावर प्रदर्शित झाला. आरआरआर आणि पठाणच्या यशानंतर निर्मात्यांनी आता प्राॅडक्शन व्हॅल्यू, अॅक्शन, सिनेमॅटोग्राफी आणि अर्थातच संगीत याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे. याची अनेक कारणे आहेत. उत्तर आणि पश्चिम भारतीय बाजारपेठेवर बॉलीवूडची नजर असली तरी दक्षिण भारतीय चित्रपट कमाई करत आहेत. कारण ६२% सिंगल थिएटर्स दक्षिण भारतात, १६% उत्तरेत, १०% पश्चिम भारतात आहेत. सिंगल स्क्रीनमधील तिकिटे मल्टिप्लेक्सच्या तुलनेत तिप्पट स्वस्त आहेत, ते दक्षिण भारतात लोक जास्त चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचे मुख्य कारण आहे. अनेक राज्यांत करमणूक कर १५-६०% पर्यंत आहे, तर कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये तो शून्य आहे, तर तेलुगू चित्रपट सर्वाधिक उत्तर प्रदेशच्या (६०%) तुलनेत सर्वात कमी १५% कर देतात.

या सर्व घडामोडी या गुरुवारी गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुबोध मेहता यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आल्या, त्यांनी कंपनीच्या भविष्यातील विस्ताराची ब्लू प्रिंट तयार केली. जेथे रिअल इस्टेटमध्ये तेजी आहे आणि जमिनीच्या कमी किमतीमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये बांधकाम उद्योग चांगले काम करत आहे, तिथेच गोदरेजच्या वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातील, असे त्यांनी स्पष्टपणे मान्य केले.

फंडा असा की, कुठेही असो, प्रथम क्रमांकाकडे धावा. कदाचित तुम्हाला त्यांची भाषा कळत नसेल, पण कालांतराने तुम्ही त्या संख्येतील खर्चाची गर्दी ओळखू शकता.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...