आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:वर्तमानात जगणे सुरू करा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक जीवनात आपल्यावर काही ना काही शेरेबाजी करणारी अनेक माणसे भेटतील. ती निंदा असो वा स्तुती, परंतु ते ऐकून कधीही भूतकाळात जाऊ नका. कुणी काही म्हणाले की आपल्याला भूतकाळात हरवून जाण्याची सवय असते. ते शेरे वर्तमानाच्या संदर्भात घेण्याचा पहिला प्रयत्न करा. वर्तमानाच्या संदर्भात घेणे म्हणजे विसरणे आणि आपल्या ध्येयावर टिकून राहणे. तरीही हवं असेल तर थोडं भविष्यात बघा, पण भूतकाळात अजिबात डोकावू नका, कारण शेरे ऐकून भूतकाळात गेलं की तणाव आलाच. हा ताण दीर्घकाळ राहिल्यास लिम्फोसाइट्स म्हणजेच डब्ल्यूबीसीचे प्रमाण कमी होते. या पेशी आपल्याला बाह्य हल्ल्यापासून वाचण्यास मदत करतात. वैद्यकशास्त्राचे हे तत्त्व मानसशास्त्रालाही लागू होते. स्वतःला आतून कमकुवत करू नका. जेव्हाही बाह्य संवाद ऐकाल तेव्हा तो वर्तमानात जगा आणि सोडून द्या. स्तुतीत खूप रस असेल तर त्याचे प्रोत्साहनात रूपांतर करा, परंतु टीका कपड्यांवरील धुळीप्रमाणे उडवून लावा. }

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...