आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Start Looking At Life In Terms Of Cooperation | Article By P. Vijayshankar Mehata

जीवनमार्ग:जीवनाकडे सहकार्याच्या दृष्टीने पाहणे सुरू करा

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन दोन असू शकतात. एक संघर्षाचा आणि दुसरा सहकार्याचा. जीवनात काही मिळवायचे असेल तर संघर्ष करावा लागतो, असा आपला समज आहे. हे खरेही असू शकते, पण जीवन हे सहकार्याचे नाव आहे यावर अधिक भर देऊया. संघर्षात अशांतता आणि सहकार्यात शांतता असते. भगवान शंकर श्रीरामांची स्तुती करताना म्हणतात- ‘गुणशील कृपा परमायतनम्। प्रणमामि निरंतर श्रीरमणम्। रघुनंद निकंदय द्वंद्व घनम्। महिपाल विलोकय दीन जनम्।’ तुम्ही सद्गुण आणि कृपेचे परम स्थान आहात. तुम्ही लक्ष्मीपती आहात, मी तुम्हाला निरंतर नमन करतो. हे रघुनंदना, जन्म-मृत्यू, सुख-दुःख, आसक्ती-द्वेष इ. द्वैत समूहांचा तुम्ही नाश करता. या दीनाकडेही दृष्टि वळवा.’ शिवशंकरांनी इथे द्वंद्व समूहाचा खूप चांगला उपयोग केला आहे. जगणे-मरणे, सुख-दुःख आणि राग- द्वेष हेच द्वंद्व आहे. आणि जिथे द्वंद्व आहे तिथे संघर्ष आहे. यात आपण अडकतो. म्हणूनच शिवशंकरांनी लक्ष्मीपती हे संबोधनही केले आहे. आपल्या सर्वांना लक्ष्मीपती व्हायचे असते. गरिबी दूर करण्यासाठी खूप संघर्ष करतो. पण या सर्व संघर्षात कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून गरीब होतो. संपत्ती तर येते, पण शांतता नाहीशी होते. हीसुद्धा एक गरिबीच आहे. त्यामुळे द्वंद्व दूर करून जीवनाकडे सहकार्याच्या दृष्टिकोनातून पाहा. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...