आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपणा सर्वांवर बाजाराचा प्रभाव आहे. प्रत्येक वस्तू वॉरंटी-गॅरंटी पाहून खरेदी करतो. गुरूसुद्धा असेच करतो. सोमवारी गुरू करतो, मंगळवारी त्यांच्यात उणीव शोधतो, बुधवारी सोडून देतो आणि गुरुवारपासून नव्या गुरूचा शोध सुरू होतो. आयुष्यभर असेच सुरू राहते व आपल्याला गुरू मिळत नाही. आता जीवनात गुरूचे महत्त्व पाहू. श्रीरामाच्या आगमनाची माहिती हनुमानाने दिल्यावर भरताने काय केले? ‘हरषि भरत कोसलपुर आए। समाचार सब गुरुहि सुनाए।’ भरताने अयोध्येला येऊन सर्वप्रथम गुरू वसिष्ठांना माहिती दिली.
जीवनातील गुरूंच्या प्रमुख स्थानाचे हे उदाहरण आहे. त्यामुळे गुरू म्हणून योग्य व्यक्ती मिळाल्यास आपले भाग्य समजा, अन्यथा हनुमान आहेच. गुरू जीवनात काय करतात, हे बुद्धांच्या या संवादातून समजेल. ‘अध दीपो भव:’। आपणच स्वतःचा दिवा व्हा. तुमचा प्रकाश तुमच्या आतच आहे. गुरू समज देतील, मार्ग सांगतील, पण आपण समजतो की आता गुरू सोबत चालतील, आपली सर्व कामे पूर्ण करतील, तर तसे नाही. आपण सक्रिय होण्याऐवजी गुरूवर अवलंबून राहतो, हे सत्य आहे. आपण विसरतो, पण गुरू आठवण करून देतात की, तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात, म्हणूनच देवाने तुम्हाला मानवरूपात निवडले आहे. चुका सुधारण्यासाठी गुरूंच्या संपर्कात राहा. भरकटणे हा आपला स्वभाव आणि आपल्याला योग्य मार्गावर आणणे ही गुरूची कृपा आहे.
पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.