आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापापाच्या बीजापासून गुन्ह्याचे झाड उगवते. गुन्ह्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, गुन्हेगारी कमी करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जातात, पण ते झाड तोडून मुळे सुरक्षित ठेवण्यासारखे आहे. गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन काम करावे लागेल. भावनांमधून पापांचा जन्म होतो, नंतर भावनांचे विचारांमध्ये रूपांतर होते, मग विचार कृत्य आणि गुन्हे बनतात. पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देतात.
मग मुले बाहेरच्या जगात जातात आणि त्यांनी करू नये असे काही तरी करतात. अलीकडे मी ऐकले की, एक पालक आपल्या मुलांना संस्कार शिबिरात पाठवायचे. मुले तिथे दिवसा ध्यान करायची आणि रात्री चोरी करायची. पकडल्या गेलेल्या मुलांचे हेच सत्य आहे, पण इतरही अनेक मुले अशाच कुटुंबांत आहेत. वास्तविक आपले कौटुंबिक वातावरणही शरीरावर अवलंबून असते. कुटुंबातील सदस्य आता एकत्र बसून मनाने काम करत नाहीत. मनावर काम करणे म्हणजे सामूहिक योग. मन भूतकाळात असेल तर स्मृती निर्माण करते आणि भविष्यात असेल तर स्वप्ने दाखवते. वर्तमानात येताना ते निष्क्रिय, नियंत्रित होते. मन सक्रिय राहिल्यास संधी मिळताच गुन्हे करील. त्यामुळे वर्तमानात थोडे राहून मनावर काम करा. जे मनावर काम करतात, त्यांची गुन्हेगारीची शक्यता नाहीशी होते.
Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.