आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:नात्यांची वीण घट्ट करा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपले स्वप्नांचे घर नेहमी इतरांमुळे मोडत नाही, कधी कधी त्यात आपलेही योगदान असते. आपल्या देशात अनेकांना सारखीच संधी मिळाली, पण तरीही ते मागे पडत राहिले, असे म्हणता येईल. संधी सर्वांना मिळाली असेल. पुढे गेलेल्यांना शिव्या देण्यापेक्षा मागे राहिलेल्यांनी स्वतःचे मूल्यमापन करावे. आपली प्रगती हे काम नव्हे, तर साधना मानावी लागेल. साधनेचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे आपल्या भावना स्थिर ठेवणे. मोसंबी आणि संत्र्याचे साल जाड असते, परंतु आतील फोडी मऊ आणि वेगवेगळ्या असतात. साल म्हणते, तुम्ही माझ्या आत सुरक्षित आहात. याच प्रकारे आपल्याला बाहेरून खूप मजबूत असले पाहिजे, पण आतून प्रामाणिक आणि नम्रदेखील असले पाहिजे. याला साधना म्हणूया. मग याच्यासह पुढे जावे. चुकीच्या मार्गाने, भ्रष्टाचार आणि गुन्हे करून पुढे गेलेल्यांचाही हिशेब केला जाईल. पण, अशी माणसे पाहून तुम्ही त्यांना शिव्या देत राहिलात आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित केले नाही तर ती खूप मोठी चूक ठरेल.

Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...