आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यभर शिकत राहा:यश... नेहमीच मेहनत घेणाऱ्या लोकांच्या शोधात असते

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या विद्यार्थ्याला शिकवले तो जेव्हा व्यासपीठावर उभा राहून शेकडो मुलांना शिकवतो, वैद्यकीय शास्त्रांचे बारकावे समजून सांगत असतो. ते पाहून खूप आनंद होतो. स्वत:चा अभिमान वाटतो. जीवन यशस्वी झाल्याचे वाटू लागते. एका शिक्षकासाठी ही सर्वात मोठी गोष्ट असते. मी सुरुवातीपासूनच माझ्या विद्यार्थ्यांना सांगत आलो की, जीवना एक लक्ष्य निर्धारित करा. ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत करा. अपयश आले तरीदेखील घाबरू नका, पुन्हा-पुन्हा प्रयत्न करा. मनातून इच्छा असली तर यश नक्कीच मिळते. कधीच खचू नका. मेहनती लोकांच्याच शोधात यश असते असे मला वाटते. वैद्यकीय शास्त्रात एक चांगली गाेष्ट अशी की, जे प्राेफेसर किंवा शिक्षक असतात ते स्वत: एक विद्यार्थीदेखील असतात. कारण वैद्यकीय शास्त्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान येते. ते शिकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी ते समजून घेणे आणि समजून सांगणे एक आव्हान असते. कोणीही कधीच परिपूर्ण नसतो. त्यामुळे माझे आता वय झाले, आता शिकण्याची क्षमता कमी झाली, काय िशकावे, जे शिकले ते पुरेसे आहे, असा विचार कधीच मनात आणू नये. कारण जेव्हा तुम्ही काही नवीन शिकणे सोडता तेव्हाच तुम्ही तुमचे ज्ञान थांबवता. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत शिकत राहायला हवे. हीच सवय पुढे घेऊन जाईल. आताच्या काळात एक बदल झाला, त्यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विचार करावा. विशेषकरून वैद्यकीय व्यवसायात आधी सेवाभाव होता म्हणून लोक येत होते. दुर्दैवाने परिस्थिती वाईट झाली. आता यात सेवाभाव पाहिला जात नसून पैशाला महत्त्व दिले जात आहे. पैशाला महत्त्व देऊ नका, हाच संदेश मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी देत असतो. जेणेकरून सामान्य लोकांचा विश्वास तुमच्यावर आणखी मजबूत व्हावा. -शब्दांकन : पवनकुमार

प्रो. डॉ. रणदीप गुलेरिया अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) चे संचालक

बातम्या आणखी आहेत...