आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावही उघडून बसले अंबराची गिरवले चांदणे मग रात्रभर मी.. जि ची ओळख तिच्या शब्दांतून होते, जी मोजक्या शब्दांत मोठा आशय लिहून जाते, जिच्या लिखाणाला एक लय, खोली अन् अथांगपण आहे, विषय कुठलाही असो, जी नेमकं तेच लिहिते, अशी गझलकारा म्हणजे अल्पना देशमुख-नाईक. “नदीला गाज नाही’ हा तिचा गझलसंग्रह खूप थोड्या अवधीत सर्वदूर गेला आहे. एका रचनेत ती म्हणते.. नोंदही माझी दिसेना काळजामध्ये तुझ्या पान मी एकेक त्याचे चाळले कित्येकदा तिच्या स्वभावात अन् लिखाणात एक समजूतदारपणा दिसतो.. जुन्या विसरून दुःखांना नवी स्वप्ने उभी केली नवे घर बांधले आपण जुने घर पाडल्यानंतर.. ती त्याच त्या गोष्टी उकरत बसत नाही. भूतकाळात वा भविष्यकाळात जगत नाही, तर वर्तमानाचा विचार करते.. तिच्या वाऱ्याप्रमाणे वेग पायांना तिन्ही सांजेस घरची काळजी दिसते इथे कवयित्रीने तिची व्याकूळता आणि काळजी सहजता व्यक्त केलीय.. ओंजळीमध्ये धुके करतात गोळा अंगणामधली उन्हे टिपतात बाया अल्पनाची कल्पनाशक्ती अवाक् करणारी आहे. असंख्य मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध यावा, तसा दरवळ तिच्या गझलेतून येत राहतो.. शब्दांच्या चिमटीत पकडता येईना आभाळाचे गूढ निळेपण जाणवते तिची तगमग, प्रेम आणि जिव्हाळा अन् याही पलीकडे त्याचा अबोला टिपताना ती लिहिते.. शब्दांची फुटणार पालवी मौनाच्या झाडाला बघू अबोला कुठवर आहे तुझ्या नि माझ्यामध्ये हा अबोला दोघांमध्ये नांदत असला, तरी... जीवघेणी काहिली येते, कंच हिरवी पालवी येते जीवनाची रीत ही आहे, ऊन जाते सावली येते या सावलीची आस घेऊन प्रत्येक जण जगत असतो. आयुष्याच्या वळणावर गझलकारा आत्मपरीक्षण करतेय.. जाणवत नाही तिचे अस्तित्व कोणाला वाहते आहे नदी माझ्यात एकाकी प्रत्येक स्त्री ही एक नदी असते आणि तिला फक्त वाहणं ठाऊक असतं. हे स्वतःचं अस्तित्व ती कसोशीने जपतेय. तिला आपल्या कवितेबद्दल विश्वास अन् प्रेम आहे.. कवितेस कधीही माझ्या वार्धक्य यायचे नाही ती काळाच्या ऐन्याचा उडणारा पारा नाही अल्पना ही एक चांगली गझलकारा तर आहेच, पण याहीशिवाय एक उत्तम गृहिणीही आहे. माय थोपटते जशी हळुवार बाळाला त्याच प्रेमाने हवी थापायला भाकर अगदी लहान वयात जीवनाचे तत्त्वज्ञान एखाद्या तत्त्ववेत्त्याने जाणावे, तसे ती लिहून जाते.. तुझे व्याकूळ होणे सांगते की तुझ्या हृदयातला आहे झरा मी किती हा प्रेमातील गोडवा की एका शेराने सारे गुलाबी व्हावे! अशी ही कवयित्री, गझलकारा. तिच्या आयुष्याची वाट अशीच गुलाबी आणि सुगंधी होवो, याच शुभेच्छा..! { संपर्क : rutakhaparde@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.