आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्काइव्हज:‘रॉकी’च्या सेटवर संजयला दृश्य समजावून सांगताना सुनील दत्तम

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा फोटो ‘रॉकी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या फाेटोमध्ये संजय दत्तसोबत त्यांचे वडील सुनील दत्तदेखील दिसत आहेत. या चित्रपटातून संजयने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सुनील दत्तने हा चित्रपट आपल्या मुलासाठी बनवला होता. सुनील जेव्हा मुलगा संजयला सीन समजावून सांगत होते, तेव्हा हा फोटो क्लिक करण्यात आला हाेता. जेव्हा संजयला शूटिंगच्या वेळी अडचण यायची तेव्हा त्यांचे वडील सुनील दत्त त्यांना समजावून सांगत आणि स्वतः सीन करून दाखवत.

चित्रपटाच्या सेटवर संजय वडिलांना घाबरत असे, मात्र दोघांची बाँडिंग चांगली होत असते. हा चित्रपट ६ मे १९८१ रोजी रिलीज झाला होता. संजय दत्तचा पहिला चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांची आई नर्गिस दत्त जग सोडून गेल्या होत्या. जेव्हा चित्रपटाचा प्रीमियर झाला तेव्हा संजयने त्यांच्या आईसाठी एक जागा रिकामी ठेवली होती. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरला आई नक्कीच त्याला आशीर्वाद देण्यासाठी येईल, असे त्यांना वाटत होते.