आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅन कार्डचा वापर ओळखीचा पुरावा, वित्तीय देवाण-घेवाण आदींसाठी केला जाऊ शकतो. काद्यानुसार, एका व्यक्तीस केवळ एक पॅन कार्ड ठेवण्यास परवानगी आहे. एकापेक्षा जास्त पॅन कार्ड अवैध आहेत. आर्थिक विश्लेषण फर्म “पैसा बाजार’ने सांगितले की, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर धारकास काय अडचणी येतील आणि काय करावे लागेल...
दुसरे पॅन कार्ड बनू शकते का? हाेय, असे शक्य आहे. अनेक लोक फसवणुकीसाठी अनेक पॅन कार्ड बनवतात. मात्र, अनेक प्रकरणांत चुकून एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड जारी होतात. उदा. एखादा पॅन कार्डसाठी अर्ज करतो आणि वेळेवर आले नाही तर तो नव्याने अर्ज करतो. हा नवा अर्ज नवे प्रकरण होते. दुसऱ्या स्थितीत पॅन कार्डच्या माहितीत सुधारणा करू इच्छितो, मात्र नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करतो. तिसरी स्थिती लग्नानंतर ठिकाण वा नाव बदलल्यामुळे नवे पॅन कार्ड घेतले जाते.
दुसऱ्या पॅन कार्डची समस्या कशी सोडवावी? वेबलिंक tin-nsdl.com/downloads/pan/download/PAN-CR-Form_NSDL%20e-Gov_01.06.16.pdf कडून फॉर्म घ्या. सरेंडर केल्या जाणाऱ्या कार्डची माहिती भरून ती नजीकच्या UTI वा NSDL TIN केंद्रावर जमा करा. यानंतर जिथे प्राप्तिकर भरला आहे, त्याच्या असेसिंग ऑफिसरला पत्र लिहा. यात दोन्ही पॅन कार्डची माहिती द्या. जे जमा करू इच्छित आहात,त्याची माहिती द्या. पत्र कर कार्यालयात जमा करा. सरेंडर पॅनची कॉपी आणि एक्नॉलेजमेंट रिसीटची कॉपी जमा करा. धारकाच्या मृत्यूच्या स्थितीतही पॅन कार्ड सरेंडर करा.
२ पॅन कार्ड ठेवल्यास अडचण काय येते? एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास धारकास ६ महिने तुरुंगवास, दंड होऊ शकतो. २ पॅन कार्ड असल्यास क्रेडिट कार्डचा अर्ज नामंजूर होऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.