आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Take Advantage Of Technology, But Keep An Eye On Teenagers |Agralekh Of Divya Marathi

अग्रलेख:तंत्रज्ञानाचा लाभ घ्या, पण किशोरवयीनांवर लक्ष ठेवा

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारीरिक निष्क्रियता हे जगातील मृत्यूचे चौथे सर्वात मोठे कारण आहे. डब्ल्यूएचओच्या अध्ययनानुसार, भारतातील ११ ते १७ वर्षे वयोगटातील ७४% मुले दिवसातून ३० मिनिटेही मैदानात खेळत नाहीत, तर अलीकडील अध्ययनानुसार, १६ ते ३९ वर्षे वयोगटातील ५९% युवक-तरुण सरासरी तीन तास ऑनलाइन गेमिंगवर घालवतात. डब्ल्यूएचओने शिफारस केली की, ५ ते १७ वयोगटातील मुलांनी दिवसातून किमान एक तास मैदानी खेळांत घालवला पाहिजे, त्यामुळे त्यांचे स्नायू व हाडे मजबूत होतील आणि मानसिक आरोग्य व संज्ञानात्मक क्षमताही सुधारेल. एनएचएफएस-५ च्या अहवालानुसार, भारतात जन्माणाऱ्या प्रत्येक पाच मुलांपैकी चार बालकांना किमान स्वीकार्य पोषण (पोषक तत्त्वे) मिळत नाही आणि याच कुपोषणामुळे बालके दुर्बल होण्याचा व जन्मानंतर पाच वर्षांत मृत्यू होण्याचा दर चिंताजनक आहे. कुपोषणग्रस्त मुले, बालवयात खेळण्यापासून दूर, पौगंडावस्थेपासून तारुण्यापर्यंत आयुष्याच्या अत्यंत सक्रिय काळात प्रत्येकी तीन तास ऑनलाइन गेमिंगमध्ये घालवणे, ही राष्ट्राचे भविष्य सुधारण्याची हमी आहे का? याहूनही मोठा धोका म्हणजे पालक मुलांना शिक्षणाच्या नावाखाली इंटरनेट सुविधा देतात आणि किशोरवयीन मुले इतर प्रकारच्या करमणुकीसाठी त्याचा वापर करू लागतात. शिक्षण सार्वत्रिक बनवण्यात इंटरनेटचा वाटा आहे, मात्र त्याच्या वापराबाबत पालक सजग न राहिल्यास मुलांचे भविष्य संकटात सापडेल.

बातम्या आणखी आहेत...