आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफंडा असा उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे भटके प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करायला हवी. त्यांचा कोरडा घसा ओला करणे ही आपली जबाबदारी आहे.
शनविारी दुपारी मी भोपाळच्या कोलार रोडवर होतो. बऱ्याच प्रसिद्ध व्यावसायिक प्रतिष्ठान आणि कॉलनीमधून जात होतो, उदा- पॅलेस आर्किड आणि अमरनाथ कॉलनी आदी. मी आत गेलो नाही. ऊन प्रचंड होते. लोक आपले दैनंदिन काम करत होते. फळ-भाज्या विकणारे त्यावर पाणी िशंपडत होते. आवश्यक सामान विकणारे दुकानदार पेपर वाचत होते आणि ग्राहकांची वाट पाहत होते. वेल्डिंग करणारे आयर्न रॉड घेऊन जात होते. कोलार रोड पोलिस ठाण्याचा हवालदार कॉलर पकडून एकाला ठाण्यात घेऊन जात होता. कुंभार एका प्लास्टिक बॉटलने पाणी पीत होता. त्याचे सर्व भांडे रस्त्यावर पसरलेले होते. दुसरीकडे, दुसऱ्या दुकानातील सिन्टॅक्सच्या टाक्या रस्त्यावर पडलेल्या होत्या. काही ग्राहक ते पाहत होते. दुकानदार फोनमध्ये व्यग्र होता. रस्ता खडबडीत हाेता. त्यावरून वाहने गेल्याने धूळ उडत हाेती. खूप रहदारी होती. थोडक्यात, तिथे फक्त आवाजच नव्हता, प्रदूषणही होते.
त्याच ठिकाणी पाच ते सहा किलाेमीटर लांब रस्त्यावर अनेक भटकी कुत्री-गुरे फिरत होती, मात्र त्यांच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. ते पाहून वाईट वाटले. त्यांच्यासाठी कोणी पाण्याची व्यवस्था केल्याचे दिसून आले नाही. ज्या श्वानांवर माझी नजर पडली ते मला या लोकांना आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे सांगा, असे म्हणत असावे असे वाटले. ज्या कुंभाराने अर्ध्या रस्त्यावर आपली वेगवेगळ्या प्रकारची भांडी ठेवली होती, त्यानेदेखील या भटक्या प्राण्यांसाठी पाण्याची काही व्यवस्था केली नव्हती. मी आकाशात पाहिले तर एकही पक्षी उडताना दिसला नाही. मात्र काहींच्या कारच्या हॉर्नमध्ये पक्ष्यांचा आवाज दिसून आला त्याचे नवल वाटले.
यावरून मला १९ मे १९२४ रोजी बीबीसीच्या थेट प्रक्षेपणाची आठवण झाली. यात गायन वादक बीट्रिस हॅरिसनने तिच्या बागेतील बुलबुलसह अप्रतिम युगल गाणे सादर केले. लाखो संगीतप्रेमींसाठी ती जादूची रात्र होती. मला सांगण्यात आले, १९४२ पर्यंत हा कार्यक्रम आदरपूर्वक प्रसारित केला जात होता. पण आता बीबीसीने ते खोटे युगल गाणे असल्याचे कबूल केले. यात एका व्यक्तीने पक्ष्याचा आवाज हुबेहूब काढला होता, तर हॅरिसनसोबत खराखुरा पक्षी गात असल्याचे प्रेक्षकांनी गृहीत धरले होते.
मी नेहमी विचार करायचो, अनेक दशकांपासून श्रोत्यांना असे वाटले नाही का, बागेत रेकॉर्डिंग उपकरणे पाहून पक्षी पळून गेले असतील. हे छोटे तपकिरी पक्षी एक हजाराहून अधिक आवाज काढू शकतात, त्यांच्या तुलनेत ब्लॅकबर्ड््स सुमारे १०० आणि स्कायलार्क पक्षी फक्त ३४० आवाज काढू शकतात. त्यांना पिंजऱ्यात राहणे आवडत नाही. उन्हाळ्यात स्थलांतर करण्याचा त्यांचा आग्रह इतका प्रबळ असतो की, त्यांना पिंजऱ्यात ठेवले तर ते पिंजऱ्याला मारून स्वत:ला इजा करतात आणि त्यात त्यांना जीवही गमवावा लागतो. गाणाऱ्या पक्ष्याचे नाव कोणाला विचारले तर अनेक जण बुलबुलचे नाव घेतात. पण आज हिरवाईने भरलेल्या देशांतही बुलबुलची संख्या निम्म्यावर आली. पृथ्वीच्या व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शेकडो सुंदर प्रजाती आपण गमावत आहोत. आपण त्यांची काळजी घेतली नाही तर एक दविस त्यांचा आवाज फक्त कारच्या हॉर्नमध्येच ऐकू येईल.
मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in एन. रघुरामन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.