आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Take Time To Communicate With Yourself As Well | Article By Pt. Vijayshankar Mehta

जीवनमार्ग:स्वतःशी संवादासाठीही वेळ काढा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विचारले नाही तर हृदयाचे ठोकेही कोणासाठी धडधडत आहेत हे सांगत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आलेल्या सुख-दु:खाला कोण जबाबदार आहे हे आत्म्याला विचारावे. आपण अनेक वेळा आपल्या शरीराची विचारपूस करतो, पण फार कमी लोक आत्म्याशी संवाद साधतात. आत्म्याशी बोलणे म्हणजे आपल्या सुख-दु:खाला जबाबदार कोण, हे स्वतःला विचारणे. काही लोक म्हणतात, हे नशीब आहे, काही म्हणतात, देवाने घडवून आणले. काही परिस्थितीला दोष देतात. देव, नशीब आणि निसर्ग किंवा परिस्थिती खूप निःपक्ष असतात. या तिघांना आयुष्यात येणाऱ्या सुख-दु:खाशी काही देणे-घेणे नसते. ते तर निःपक्ष असतात. ते म्हणतात, आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था करत जातो. माणूस ते कसे घेतो, इथून त्याच्या सुख-दु:खाला सुरुवात होते. सुख आणि दु:ख ही आपली निर्मिती आहे. आपण ठरवतो की, या परिस्थितीत आपण दुःखी होऊ, दुसऱ्या परिस्थितीत आपण आनंदी होऊ. आणि आपण प्रयत्न करतो. ते आपल्या प्रयत्नांचे फळ असते. आपला आत्मा आपल्याला हे समजावून सांगेल. त्यामुळे चोवीस तासांत थोडा वेळ काढून आत्म्याशी बोला. आत्म्याशी संवाद साधण्याचे अनेक मार्ग आहेत. भजन, कीर्तन, पूजन, योग या सर्वांत तुम्ही आत्म्याशी चर्चा कराल. तुमच्या अशांतता किंवा शांततेचे कारण तुम्हीच आहात, हे तुमचा आत्मा चांगल्या प्रकारे समजावून सांगेल.

पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...