आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:जबाबदारी घेणे म्हणजे दोष स्वीकारणे नव्हे!

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील बहुतांश शहरांमध्ये एक सामान्य दृश्य सर्वांनाच त्रास देते. डस्टबिन रिकामी असतानाही बाहेर कचरा पसरत राहतो. कचरा उचलणारी टीम प्रथम बाहेर पसरलेला कचरा उचलून मुख्य ट्रकमध्ये टाकते. त्यामुळे त्यांचे काम दुप्पट होते, कर्मचाऱ्यांना पराभूत वाटते आणि अखेरीस ‘चलता है’ वृत्ती घराघरात पोहोचते. उपाय सोपा आहे. शहर स्वच्छ व्हायचे असेल तर कचरा बाहेर न टाकता डस्टबिनमध्ये टाकण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी पहिले काम केले तर सफाई कामगारांचे काम सोपे होईल आणि हे कामगारही आपला परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवतील. हळूहळू शहराला स्वच्छ शहराचा टॅग मिळेल. स्वच्छतेच्या बाबतीत दंड वगैरे कडक नियमांमुळे संपूर्ण शहराची संस्कृती बदलू शकते, असे कोणी म्हणत असेल तर मी म्हणेन की, तो त्याच्या विधानात ‘जबाबदारी’ घेत नाही. मी फ्रान्सच्या सिस्टर आंद्रेबद्दल ऐकले तेव्हा ही तुलना माझ्या मनात आली. जगातील सर्वात वृद्ध आंद्रे यांचे ११९ व्या वाढदिवसाच्या २५ दिवस आधी या मंगळवारी निधन झाले. त्या जपानच्या केन तनाका यांचा विक्रम मोडू शकल्या नाहीत, केन यांचा ११९ वर्षे १०७ दिवस जगल्यावर गेल्या वर्षी १९ एप्रिलला मृत्यू झाला. दुसऱ्या सर्वात वृद्ध व्यक्तीचा विक्रम केन यांच्या नावावर आहे, पहिले फ्रान्सचे जीन कॅलमेंट होते, त्यांचे ४ ऑगस्ट १९९७ रोजी वयाच्या १२२ वर्षे १६४ व्या दिवशी निधन झाले. मानवाच्या दीर्घायुष्यावर काम करणाऱ्या अनेक संशोधकांचा विश्वास आहे की, जीन्स यांचा विक्रमदेखील टप्प्याटप्प्याने मोडला जाईल, एखादी व्यक्ती १२४ वर्षांपर्यंत, नंतर एखादी १२७ वर्षांपर्यंत पोहोचेल, तिसरी १३० वर्षांच्या वयाला स्पर्श करेल, असे हे शतक संपण्यापूर्वी घडेल. आपल्यापैकी बहुतेकांना जीवन परिपूर्णतेने जगायचे असले तरी सिस्टर आंद्रेइतके दीर्घ नसले तरी आपण ते साध्य करण्याची जबाबदारी दाखवतो का? माझा ठाम विश्वास आहे की, आपणा मानवांना हळूहळू ‘जबाबदारी’ घेण्याचा अर्थ कळू लागला आहे. अलीकडेच प्रकाशित संशोधनात म्हटले आहे की, अल्कोहोलच्या अगदी कमी प्रमाणाचेही दुष्परिणाम होऊ शकतात. बहुतांश आयटी जाणकार लोकसंख्येला हेदेखील समजले आहे की, आपण मोबाइल-एअरपॉड्ससह जन्माला आलो नाही. त्यांनी हळूहळू या आधुनिक गॅजेट्सपासून स्वतःला दूर ठेवण्यास आणि पंचेंद्रियांना विश्रांती देण्यास सुरुवात केली आहे. अनेक दशकांपूर्वी आपण आठवड्यातून एकदा किंवा ठराविक दिवशी उपवास करायचो, तसे आता काही लोक ‘नो मोबाइल डे’ साजरा करत आहेत आणि डोळे व कानांसाठी तंत्रज्ञान-उपवास करत आहेत. ‘स्क्रीन अवलंबित्व’ कमी करण्यासाठी युवक नेचर ट्रेल्सचे आयोजन करत आहेत. योग वर्ग, हास्य क्लब, कथा सांगण्याची सत्रे आणि स्नायूंना आराम देणारे व तणाव कमी करणाऱ्या अनेक उपक्रमांसाठी आजूबाजूला पाहा. { फंडा असा की, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, जबाबदारी घेणे म्हणजे कठीण परिस्थितीसाठी दोष घेणे असे नाही, तर ती फक्त आपण त्या सुधारणेत कोणत्याही कारणास्तव कोणती भूमिका बजावू शकतो हे ओळखणे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...