आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधीचा मार्ग:काैशल्य आता पदव्यांपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे काॽ

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सर्वांनी त्या यशस्वी आंत्रप्रेन्योर्स आणि सीएक्सओंची कहाणी ऐकली आहे, ज्यांनी कोणत्याही व्यावसायिक योग्यतेशिवाय यश मिळवले आहे. आधी कंपन्यांसाठी पदव्याच यशाचे मापदंड असायचे, ते आता अशा उमेदवारांचा जास्त शोध घेत आहेत, ज्यांच्यात कौशल्य शिकण्याची तत्परता असेल आणि जे आपल्या ज्ञानाचा उपयोग करू शकतील. तुम्ही पारंपरिक शिक्षण पद्धतीवर विश्वास ठेवत नसाल तर तुम्हाला हे ऐकून दिलासा मिळेल की, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्याचे दुसरेही मार्ग आहेत. मशीन लर्निंग, ऑटोमेशन, एआयच्या क्षेत्रात झालेल्या विकासामुळे जग बदलत आहे. तसेच विविध क्षेत्रांत नव्या भूमिकाही पार पाडत आहेत. मात्र कौशल्याच्या अभावामुळे या भूमिकांसाठी उपयोगी लोक भेटत नाहीयेत. यामुळेच मी आता रीस्किलिंग आणि अपस्किलिंगच्या संधींवर जास्त भर देत आहे. इंडिया स्किल्स रिपोर्टनुसार २०२३ मध्ये अवघे ५०.३ टक्के पदवीधर असे आहेत, जे नोकरी मिळवण्यास पात्र आहेत. दुसरीकडे, स्किल आधारित भूमिका वाढत आहे. यामुळे विविध उद्योगांमध्ये रोजगार-पात्रता यांच्यात अंतर वाढत आहे. सध्या भारताच्या कार्यशक्तीच्या फक्त १२ टक्के लोकांकडेच डिजिटल स्किल्स आहे. मात्र, यातच जे नव्या काळाचे कौशल्य शिकणे आणि स्वत:ला नोकऱ्यांसाठी तयार करण्यासाठी अतिरिक्त कष्ट घ्यायला तयार असणाऱ्या व्यावसायिकांसाठी संधीही लपल्या आहेत. अशा अनेक संस्था व कंपन्या आहेत, ज्या अपस्किलिंगच्या वाढत्या मागणीला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. एज्युटेक इंडस्ट्रीच्या मागणीत यामुळेच चांगलीच वाढ झाली आहे. अपग्रेड आणि बोर्ड इनफिनिटीसारख्या बूटकॅम्प्स समोर आले आहे, जे कौशल्य विकासात लोकांची मदत करतात. उच्च शिक्षणातही सनस्टोन एज्युव्हर्सिटीसारखे अनेक इतर प्लेअर्स पुढे आलेत, जे विद्यार्थ्यांना कुशल बनवून शिक्षण व कॉर्पोरेट्सच्यामधील अंतर कमी करतात.

जॉन गार्डनर यांनी त्यांचे पुस्तक ‘कॅन वी बी इक्वल अँड एक्सिलेंट टू’मध्ये कौशल्य व पात्रतेचे महत्त्व खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता पात्रता त्याच पद्धतीने बेकार सिद्ध होऊ लागतील, जसे काळासोबत वारशात मिळालेले विशेषाधिकार अनुपयोगी होतात. यामुळे एखादी पदवी वा पदविका प्राप्त करण्याची तुमची इच्छा नाही तर आजच्या काळात यामुळे जास्त फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडू शकता आणि एखाद्या मोस्ट वाँटेड स्किलमध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकता. प्रश्न हा आहे की, आज कोणत्या कौशल्याची मागणी आहे?

स्किल्स इन डिमांड : सध्या ज्या पद्धतीने डिजिटलायझेशन होत आहे, त्यामुळे प्रत्येक उद्योगात टेक व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. डेव्होप्स, सायबर सिक्युरिटी, डाटा अॅनालिसिस, एआय, क्लाऊड कम्प्युटिंग इत्यादीत आज टॉप १० मोस्ट इन डिमांड स्किल्समध्ये समावेश आहे. ब्लॉकचेन आणि मेटावर्ससारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे नव्या संधींसाठी दरवाजे उघडले आहेत. यात रंजक बाब म्हणजे हे सर्व काेर्सेस वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेल्या व्यावसायिकांनाही शिकता येतात. गोष्ट एवढीच नाही, पुरवठा साखळी व्यवस्थापन, डिझाइन थिकिंग, प्रोजेक्ट व्यवस्थापन, उत्पादन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग कौशल्याचेही आज महत्त्व आहे. भारत सरकारचे स्वयम पोर्टल अनेक अशा डोमेन्समध्ये मोफत प्रशिक्षणाची सुविधा देत आहे, तर आयआयएम आणि एसपी जैनसारख्या संस्थाही कमी खर्चात डेडिकेटेड सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध करतात.

पुढचा मार्ग : अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस इनकॉर्पोरेशनच्या एका अहवालानुसार भारतात डिजिटल स्किल्सची गरज २०२५ पर्यंत नऊपट होईल. सध्या ६७ टक्के रिक्रूटर्स असे आहेत, जे उमेदवारांच्या शैक्षणिक योग्यतेऐवजी त्यांचे कौशल्य व अनुभवाला जास्त महत्त्व देतात. गिग इकॉनॉमीच्या उदयामुळेही नवे कौशल्य विकसित होत आहे आणि लोक आता रिमोट वर्किंग करू लागलेत. अशात प्रश्न आहे की, तुम्ही बदल स्वीकारण्यास व बदलत्या काळासाठी आवश्यक कौशल्य शिकण्यास तयार आहात का? कारण यामुळेच तुमच्या करिअरची दिशा ठरेल. निरंतर शिकत राहा आणि आपले कौशल्य काळानुसार करा. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

पंकज बन्सल Taggd (डिजिटल रिक्रुटमेंट प्लॅटफॉर्म) आणि वर्क युनिव्हर्सचे सहसंस्थापक

बातम्या आणखी आहेत...