आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Talk To Yourself If You Want To Make Life Worthwhile Gnanavatsal Swami, Motivational Speaker

अनंत ऊर्जा:आयुष्य सार्थक करायचे असेल तर स्वतःशी बोला

​​​​​​​ज्ञानवत्सल स्वामी| प्रेरक वक्ते24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण भक्ती आणि श्रद्धेने दररोज १५ मिनिटे स्वतःसोबत जीवनाचा प्रवास करा - जीवन अर्थाच्या रंगांनी रंगून जाईल.

पद, प्रतिष्ठा, पैसा आणि मान-सन्मानाच्या लालसेमध्ये आपण स्वतःलाच विसरलो आहोत. स्वतःला वेळ देणे तर सोडा, आपण स्वतःशी बोलत नाही. स्वत:पासून हा दुरावणे हा लयबद्ध जीवनाच्या मार्गात मोठा अडथळा आहे. तुम्ही कधी तरी तुमच्याच मोबाइल नंबरवर कॉल करून पाहा - आयुष्यातील वास्तवाचा आवाज ऐकू येईल की - ‘तुम्ही डायल केलेला नंबर सध्या बिझी आहे...!’ परिस्थिती अशी आहे की, व्यग्र राहण्यात जीवनाचा आनंद घेणे आणि स्वतःत सुधारणा करणे आपण विसरलो आहोत. एवढ्या व्यग्रतेचा उपयोग काय? मानवाला चेतना आणि बुद्धी देऊन देवाने वाळवंटात बीज पेरले आहे का?

या वेळी एका लाकूडतोड्याच्या कथेतून जीवनविद्या शिकूया. रोज एक लाकूडतोड्या सूर्योदयापूर्वी उठून लाकूड तोडण्यासाठी जंगलात जात असे. सूर्य मावळेपर्यंत तो मेहनत करत असे. हा त्याचा जीवनक्रम झाला होता, पण गरिबीचा फास सुटत नव्हता. एका साधूला भेटल्यावर आपला भूतकाळ सांगून व्यथा व्यक्त करून त्याला गरिबीच्या दुष्टचक्रातून मुक्त होण्याचा मार्ग जाणून घ्यायचा होता. संताने सांगितलेल्या उपायाने त्याचे आयुष्य बदलले. त्या मार्गाचा अवलंब करून आपणही जीवनाचा आनंद घेऊ शकतो.

संताने लाकूडतोड्याला एवढेच सांगितले की, तू रोज रात्री कुऱ्हाडीला धार लावायला सुरुवात कर. मनात विचार येऊ शकतो की, हा तर सामान्य धडा आहे, लाकूडतोड्यालाही ते कळतं, यात नवीन ते काय? पण सहज सत्य वाटणारी ही गोष्ट आपल्या धावणाऱ्या आयुष्यात इतकी सोपी नाही. आपलीही परिस्थिती लाकूडतोड्यापेक्षा फारशी वेगळी नाही. श्रमशक्ती सतत वापरतो. कधी कधी विचार येतो की, मी जेवढे प्रयत्न करतो, त्यानुसार मला फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या कुऱ्हाडीला धार लावणे आवश्यक आहे, म्हणजे स्वतःशी संवाद साधून आयुष्य उजळावे. भगवान स्वामीनारायण वचनामृतात म्हणतात की, बाह्य दृष्टीने गोष्टी पाहता आणि तपासता येतात, पण पाहणारा स्वतःला पाहू शकत नाही. हे अज्ञानातील अतिशय अज्ञान आहे. जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी २४ तासांत १५ मिनिटे स्वत:ला द्या, स्वतःशी संवाद साधा.

एक साधा प्रश्न उद्भवेल की - स्वसंवादात काय करावे? प्रथम, नवीन व्यवसायाच्या हुरुपाप्रमाणे उत्साहाने सुरुवात करा. डायरी-पेन घेऊन शांत बसा आणि चार गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. आज मी कोणत्या प्रसंगांतून गेलो आहे, ज्यासाठी मला धन्य वाटते? आज असे काय घडले, त्यात मी आणखी चांगले करू शकलो असतो असे काय आहे? उद्यासाठी संभाव्य कृती योजना आणि प्रार्थनाही लिहा. हे चार सामान्य वाटणारे मुद्दे स्वीकारले आणि प्रामाणिकपणाने पाळले तर ते आयुष्याला कलाटणी देणारे ठरू शकतात.

दैनंदिन जीवनात आपल्या तत्त्वांपासून एक-एक इंच दूर गेलो तर काही वर्षांनी हे अंतर आपल्याला जीवनाच्या ध्येयापासून खूप दूर नेईल. एका चक्रीवादळाने अमेरिकेत विनाशाच्या खुणा सोडल्या. हवामान खात्याचे खबरदारीचे इशारेही वाचवू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांची शीर्षके होती - अखेर बॉस कोण आहे, याची अनेकदा देव आपल्याला आठवण करून देतो! देवावर श्रद्धा असेल तर जीवनात चमत्कार घडतात. तुमची लेखी प्रार्थना कामाला येईल. जीवनात यशस्वी होण्यासाठी लोक काही युक्त्या वापरतात. परंतु, श्रद्धेने दररोज १५ मिनिटे स्वतःसोबत जीवनाचा प्रवास करा - जीवन अर्थाच्या रंगांनी रंगून जाईल.

संताने लाकूडतोड्याला एवढेच सांगितले की, तू रोज रात्री कुऱ्हाडीला धार लावायला सुरुवात कर. मनात विचार येऊ शकतो की, हा तर सामान्य धडा आहे, लाकूडतोड्यालाही ते कळतं, यात नवीन ते काय? पण सहज सत्य वाटणारी ही गोष्ट आपल्या धावणाऱ्या आयुष्यात इतकी सोपी नाही. आपलीही परिस्थिती लाकूडतोड्यापेक्षा फारशी वेगळी नाही. श्रमशक्ती सतत वापरतो. कधी कधी विचार येतो की, मी जेवढे प्रयत्न करतो, त्यानुसार मला फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या कुऱ्हाडीला धार लावणे आवश्यक आहे, म्हणजे स्वतःशी संवाद साधून आयुष्य उजळावे. भगवान स्वामीनारायण वचनामृतात म्हणतात की, बाह्य दृष्टीने गोष्टी पाहता आणि तपासता येतात, पण पाहणारा स्वतःला पाहू शकत नाही. हे अज्ञानातील अतिशय अज्ञान आहे. जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी २४ तासांत १५ मिनिटे स्वत:ला द्या, स्वतःशी संवाद साधा.

हा दैनंदिन सराव एका स्थिर सुव्यवस्थित जीवनशैलीची देणगी देतो. जीवनातील चांगल्या घडामोडींसाठी आपल्याला जागृत करतो. चांगले पाहण्यासाठी डोळे उघडतात, त्यामुळे जीवन अधिक सार्थक वाटते. येणाऱ्या उद्याला आपल्या इच्छेनुसार आकार देण्याची दृष्टी-शक्ती देते. ज्यांच्याकडे उद्याचे नियोजन नसते ते फक्त जगत जातात आणि रुक्षपणेे ते अमलात आणत असतात. जागरूक लोकांबाबत असे घडत नाही, कारण ते स्वतःच स्वतःला दिशा दाखवतात.

इंच दूर गेलो तर काही वर्षांनी हे अंतर आपल्याला जीवनाच्या ध्येयापासून खूप दूर नेईल. एका चक्रीवादळाने अमेरिकेत विनाशाच्या खुणा सोडल्या. हवामान खात्याचे खबरदारीचे इशारेही वाचवू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांची शीर्षके होती - अखेर बॉस कोण आहे, याची अनेकदा देव आपल्याला आठवण करून देतो! देवावर श्रद्धा असेल तर जीवनात चमत्कार घडतात. तुमची लेखी प्रार्थना कामाला येईल. जीवनात यशस्वी होण्यासाठी लोक काही युक्त्या वापरतात. परंतु, श्रद्धेने दररोज १५ मिनिटे स्वतःसोबत जीवनाचा प्रवास करा - जीवन अर्थाच्या रंगांनी रंगून जाईल.

भगवान स्वामीनारायणांचे निस्सीम भक्त गुणनाथस्वामी यांनी एक सुंदर मुद्दा मांडला - ‘अनेक असे आहेत ज्यांचे मन त्यांच्याशी खेळते, मात्र मनाशी खेळणारे दुर्मिळ असतात.’ सोप्या शब्दांत, ज्यांच्याकडे भविष्याची योजना आहे, ते मनाशी खेळतात आणि त्याला खेळवतात. बहुतांश माणसं मनाच्या तालावर नाचणारी असतात. चुका सुधारल्याने व्यक्तिमत्त्वातील सर्वोत्कृष्टता समोर येते.