आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृपया-धन्यवाद म्हणणे हे शब्द अगदीच सामान्य आहेत, पण हा एक शिष्टाचार आहे जो मुलांना सर्वप्रथम शिकवायला पाहिजे. लहानपणापासूनच ‘प्लीज़ किंवा कृपया’ आणि “थॅक्यू किंवा धन्यवाद’ म्हणण्याचे महत्त्व सांगा. जेव्हा आपण कोणाला काही विचारतो किंवा विनंती करतो, त्यावेळी त्यांना प्लीज म्हणावे आणि कोणाची मदत घेतांना किंवा कोणाकडून एखादी वस्तू घेतल्यावर थॅक्यू म्हणावे असे शिकवा. जर पालक मुलांकडून स्वत: काही घेत असतील आणि थॅक्यू यू म्हणत असतील किंवा एखादे काम करवून घ्यायचे असेल तर प्लीज म्हणत असतील तर मुलं स्वत:च हे आत्मसात करतील. चूक झाल्यावर माफीही मागता आली पाहिजे.
काही घेण्यापूर्वी परवानगी विचारणेे जर मुलांना काही पाहिजे असेल, हवे असल्यास ते घेण्यापूर्वी परवानगी विचारण्याची सवय लावा. त्यांना सांगा की, दुसऱ्यांची कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी ती विचारूनच घ्यावी. कोणाचीही वस्तू ते न विचारता घेऊ शकत नाहीत. मग ती वस्तू त्याचा मित्र, नातेवाईक किंवा आई-वडील यांचीच का असेना. मुलांनी एखादी वस्तू घेतली असेल तर ती परत करताना थॅक्यू म्हणून परत करा आणि ती वस्तू जागच्या जागी ठेवावी असेही शिकवा.
‘प्रायव्हसी’ चे महत्त्व सांगा मुलांना प्रायव्हसीचे महत्त्व िशकवायलाच पाहिजे. कुणाच्या खोलीत किंवा घरात जाण्यापूर्वी दरवाज्यावर नॉक करुनच आत येऊ का असे विचारणे गरजेचे आहे. जर मुलांची खोली वेगळी असेल तर तुम्ही त्यांच्या खोलीत जातांना दरवाजा नॉक करुन आत जा. त्यांना सांगा, “दुसऱ्यांच्या खोलीत जायचे असेल तर दरवाज्यावर नॉक करुन आत जावे.’ असे त्यांना सांगा. जेव्हा मुलगा घरातून बाहेरच्या जगात जाईल तेव्हा हा शिष्टाचार त्याच्या उपयोगात येईल.
बोलण्याची पद्धत ओरडणे, चिडणे आणि आरडाओरड करणे ही कुणाशी बोलण्याची योग्य पद्धत नाही. मुलांना न चिडता प्रेमाने अगदी आरामात आपले म्हणणे मांडावे हे शिकवा. तुम्ही त्याच्यासमोर चांगले वागून त्यांना चांगल्या प्रकारे बोलणे शिकवू शकता. जर कुणी दुसरी व्यक्ती बोलत असेल तर त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यावरच आपण बोलावे, बोलणाऱ्या दोन व्यक्तींच्या मध्ये आपण बोलू नये हेही सांगा. जर कुणी काही विचारत असेल तर त्याचे उत्तर शांतपणे द्यावे, हे त्यांना शिकवा.
कुणाचीही चेष्टा-मस्करी करु नका बऱ्याच मुलांमध्ये कोणाचीही चेष्टा-मस्करी करण्याची सवय असते. लहानपणी ही सवय खूप चांगली वाटते, पण मोठे झाल्यावर हीच सवय अपमानात बदलते. त्यामुळे मुलांना असे करु नये हेच शिकवावे. खरंतर, मुले असे वागायला मोठ्यांकडूनच शिकतात, अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर काहीही बोलणे किंवा कोणाची चेष्टा-मस्करी करणे टाळा.
स्वच्छता-टापटीप शिकवा स्वच्छ राहण्यासंबंधीही मुलांना शिकवा. मुलांना खोकताना किंवा शिंकताना तोंड रुमालाने झाकायला शिकवा. मुलाच्या खिशात रुमाल ठेवा, शर्ट किंवा टी-शर्टवर पिन करा. यासोबतच नाकात बोट घालणे किंवा अन्न पसरवून खाणे यासारख्या वाईट सवयींची माहिती द्या. विशेषत: सावर्जनिक ठिकाणी वावरताना मुलांना शिकवलेल्या या गोष्टी खूप उपयुक्त ठरतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.