आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Teach Kids Financial Management Through Pocket Money | Article By Team Madhurima

सजग पालकत्त्व:पॉकेटमनीतून मुलांना शिकवा आर्थिक व्यवस्थापन

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या पिढीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. ही पिढी पैसे साठवण्यापेक्षा खर्च करण्यासाठी अधिक उत्सुक असते. त्यामुळे पॉकेटमनीच्या माध्यमातून मुलांना आर्थिक व्यवस्थापन कसे शिकवता येईल याबद्दल जाणून घेऊ..

पॉकेटमनी कधीपासून सुरू करावा? साधारणपणे पाच ते सात वर्षांपासूनच्या वयातल्या मुलांना पॉकेटमनी देण्यास सुरुवात केली जाते. अशावेळी सुरुवातीच्या चार ते सहा आठवड्यांचा पॉकेटमनी मुलांना जमा करण्यास सांगा. पैसा म्हणजे काय हे कळू द्या. त्यांना पैसे मोजायला शिकू द्या, जेव्हा त्यांना एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासेल आणि त्यासाठी असणारे पैशाचे महत्त्व कळेल, तेव्हापासून मुलं पॉकेटमनी देण्यायोग्य झाली आहे असे समजा.

रक्कम निश्चित करा मुलांना त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या इतर मित्रांप्रमाणे पॉकेटमनी देऊ नका. तर पॉकेटमनीची रक्कम ठरवताना... (१) मुलांच्या वयानुसार पॉकेटमनी ठरवा. उदा. जर मूल ६ वर्षांचे असेल तर तुम्ही त्याला आठवड्यातून ६ रुपये देऊ शकता, जर वय १० वर्षे असेल तर पॉकेटमनी म्हणून १० रुपये निश्चित करा. दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी, सध्याच्या पॉकेटमनीमध्ये एक रुपयाने वाढ करा. गरजांनुसार, रक्कम वयाच्या दुप्पट देखील केली जाऊ शकत.े (२) मुलांचा पॉकेटमनी पालकांनी स्वत:च्या उत्पन्नानुसार ठरवावा. त्यासाठी मुलांना आगाऊ माहिती द्यावी. (३) मुलांना घरातील लहानमोठी कामं सांगून त्याबदल्यात पैसेही देता येऊ शकतील. यामुळे पैसे मिळवण्यासाठी काम करावे लागते, हे मुले शिकतील. (४) मुलांच्या गरजेनुसारही पॉकेटमनी ठरवता येऊ शकतो. उदा. मुलांचा वाहतूक खर्च, जेवण इत्यादी.

नियम बनवा आठवड्यासाठी किंवा महिन्याभराचा पॉकेटमनी मुलांना देत असाल आणि पॉकेटमनी मुदतीपूर्वीच मुलांकडून खर्च होत असेल तर जास्तीचे पैसे मिळणार नाहीत असा नियम बनवा. मुलांना एखादी आवडती वस्तू घ्यायची असेल तर त्यांनी जमा केलेल्या पॉकेटमनीतूनच खरेदी करावी लागेल हेही सांगा. मुलांना पॉकेटमनी दिल्यानंतर आवश्यक खर्चाची यादी बनवणे, बजेट बनवणे, खर्च कसा करायचा ते सांगणे इ. गोष्टी शिकवा. उदा. मिळालेल्या पॉकेटमनीतील ५० टक्के रक्कम जमा करणे आणि ५० टक्के खर्चासाठी ठेवणे.

खेळाच्या माध्यमातून वित्त व्यवस्थापन जेव्हा मुलांना पैशाचा अर्थ समजेल तेव्हा त्यांचे ज्ञान आणि समज वाढवण्याकडे लक्ष द्या. मुलांसोबत खरेदी-विक्रीचा खेळ खेळून त्यातून मोलभाव करणे शिकवा. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी त्यांना पॉकेटमनी देण्यात काहीच गैर नाही. यामुळे मुलांना इच्छा आणि गरज यातील फरक समजेल. मर्यादित पैसे असल्यामुळे, ते आवश्यक तितकीच खरेदी करतील. मुलांना पैशांचे महत्त्व समजेल. योग्य आणि अयोग्य ठिकाणच्या खर्चातील फरकही समजेल. इच्छांवर ताबा मिळवून गरजांना पूर्ण करण्यासाठी बचत करणे आणि वाट बघणे याचेही मुलांना ज्ञान मिळेल.

बातम्या आणखी आहेत...