आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी रिसर्च:गणिताची सूत्रे आणि संगीतातून जगण्याचे धडे देतात शिक्षक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक आपल्याला फक्त परीक्षेतच उत्तीर्ण होण्यासाठी सक्षम बनवत नाहीत तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करतात. शिक्षणाच्या मैदानावर शिक्षकाच्या घामानेच विद्यार्थ्याचे भवितव्य फलदायी ठरते. गणित, विज्ञान, संगीत यांसारख्या विषयांतून ते जीवनाचे धडे शिकवतात.

गणितातून शिकवले, एका सूत्रातून प्रत्येक समस्येचे समाधान मिळत नसते 1. कधी हार मानू नये प्रत्येक समस्येवर उपाय असतात गणित शिकवते की प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे अनेक मार्ग आहेत. म्हणून, समस्या समजून घ्या, नंतर नवीन मार्गांनी उपाय शोधा.

2. योग्य पाऊल ध्येय गाठणेच महत्त्वाचे नसते उत्तर बरोबर असूनही मधली पायरी चुकली तर गुण वजा होतात. त्याचप्रमाणे चुकीच्या मार्गावरून ध्येय गाठले तर नुकसान निश्चित असते.

3. छोटे पाऊल मोठ्या कामाचे वर्गीकरण करा भागाकाराने शिकवले, संख्या मोठी असली तरी भागाकार करून ती लहान करता येते. उद्दिष्टांची विभागणी करा. संशोधन : स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, गणित चांगले असेल तर समस्या सोडवण्याची, निर्णय घेण्याची क्षमता जास्त असते.

विज्ञानातून शिकवले, जे कधी घडले नाही, तेही शक्य, विश्वास ठेवा 1. प्रयत्न करत राहा अपयश ही यशाची पायरी आहे स्वत:वर आत्मविश्वास असू द्यावा. परिणाम यायला वेळ लागत असतो. जे धीर गमावणारे ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत.

2. प्रश्न विचारा ‘कसे’च्या आधी ‘का’ चे उत्तर शोधावे कोणताही प्रयोग करण्याआधी ते का करत आहोत त्याचे उत्तर स्पष्ट असावे, मग कामात अडचण येत नाही आणि ते पटकन पूर्ण होते.

3. इच्छा बाळगा जशी क्रिया तशी प्रतिक्रिया असते जितक्या जोराने चेंडू खाली माराल तितकी तो उंच जाईल. म्हणजेच मोठ्या अपयशानंतर मोठ्या यशाचा मार्ग खुला होतो.

संशोधन : प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, विज्ञानाने लोकांचे जीवन सोपे केल्याचे ७९ टक्के प्रौढांचे म्हणणे आहे.

संगीतातून शिकवले, दुसऱ्याचे ऐका, नाहीतर संतुलन जमणार नाही 1. सर्वांसोबत चला मोठ्या गोष्टींसाठी अनेकांची साथ हवी महान संगीत जेव्हा बनते तेव्हा ते अनेकांनी मिळून बनवलेले असते. त्यात अनेकांनी आपली बुद्धी पणाला लावलेली असते.

2. अभ्यास करत राहा परिपूर्ण नाही, पण चांगले बना ज्याप्रमाणे संगीतात रियाज महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे जीवनात अभ्यास केल्याने परिपूर्ण बनता येते, तेही नाही तर चांगले बना.

3. शिस्त बाळगा ध्यानातूनच संतुलन साधता येते कोणत्याही कामात एकाग्रता असली तर ते शक्य होते. तसेच जीवनात शिस्त असली तर कोणतेही काम अशक्य राहत नाही.

संशोधन : केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, संगीत शिकणाऱ्यांमध्ये तणाव कमी असतो, ते मानसिक समस्यांना सहज सामोरे जातात.

बातम्या आणखी आहेत...