आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:तंत्रज्ञान-निसर्गाच्या धोक्यांपासून वाचवू शकते ‘स्लो’ जीवन

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील चोरांना आता तुमचे पैसे लुटायचे नाहीत! होय, हे खरं आहे. कारण त्यांना यापुढे सीसीटीव्हीच्या नजरेत किरकोळ चोरीचा धोका पत्करायचा नाही. त्यामुळे ते तुम्हाला एकदाच लुटायची योजना आखत आहेत, तेदेखील तुमच्या पूर्ण ओळखीसह, जेणेकरून तो तुम्ही बनून तुमच्या ओळखीसह सर्व आर्थिक व्यवहार करू शकेल. मग तो कितीही लूट करू शकतो. त्यातही कायदा आपल्यापर्यंत पोहोचतोय, असे त्याला वाटू लागताच तो शांतपणे बाहेर पडू शकतो आणि दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. विश्वास वाटत नसेल तर पुढे वाचा...

गेल्या महिन्यात हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी एका व्यक्तीला दोन हजार लोकांच्या फिंगरप्रिंटसह पकडले आहे, तो फसवणुकीसाठी फेक आयडेंटिटी तयार करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून अनेक सिमकार्ड आणि बंद केलेल्या बँक खात्यांची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्या फिंगरप्रिंटचा वापर करून ते बनवण्यात आले होते. हे फक्त एक प्रकरण आहे आणि ओळख चोरीची अशी अनेक प्रकरणे असू शकतात, असा त्यांचा विश्वास आहे. आपला आधार क्रमांक, जन्मतारीख, पत्ता कुठे तरी उपलब्ध असल्याने, त्यांना केवळ बायोमेट्रिक ओळख चोरून फिंगरप्रिंटची गरज पडते, त्यामुळे आपले नाव वापरून सायबर गुन्हे करण्यास मदत होते.

याचप्रमाणे देशातील सर्वात महागड्या शहरात मुंबईत प्रॉपर्टी घेतल्याने आपले भविष्य सुरक्षित राहील, असा तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी वाचा की, मुंबई खरंच दरवर्षी २ एमएम बुडत चालली आहे. नुकतेच जिओफिजिकल रिसर्च लेटर जर्नलमध्ये सर्वेक्षण आणि समीक्षा करण्यात आली. त्यात ९९ देशांच्या किनारपट्टीच्या शहरांत मुंबई, चीनमध्ये तियानजिन-शांघाय, इंडोनेशियामध्ये सेमारंग-जकार्ता, व्हिएतनाममध्ये हो ची मिन्ह-हनोईसारखी शहरे आहेत. ‘लँड सबसिडन्स इन कोस्टल सिटीज’ नावाच्या अभ्यासात पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या उभ्या हालचालींचा संदर्भ देतात. भूजलाचे शोषण, खाणकाम, नैसर्गिक पाणथळ जागा आणि इतर पर्यावरणीय संकटे तसेच मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे आहे. तियानजिन दरवर्षी ५.२ सेमी दराने जगातील सर्वात जलद बुडणारे किनारपट्टीचे शहर बनेल आणि जमीन बुडण्याची क्रिया बदलली जाऊ शकत नाही.

या सर्व घडामोडींपासून अनभिज्ञ, मोठ्या संख्येने तरुण हळूहळू अत्यंत गोंधळलेल्या जगापासून (तंत्रज्ञानाशी जोडलेले) आणि प्रवेशद्वार किंवा मेट्रो शहरांसारख्या विकसित ठिकाणांपासून दूर जात आहेत. ते कमी विकसित ठिकाणांहून काम करत आहेत, पाण्याच्या स्रोतासह सायकल चालवण्याचा आनंद घेत आहेत, ते स्वतः स्वयंपाक करतात, शेतात काम करायलाही तयार असतात, आजूबाजूच्या हिरवाईत आणि इतर प्रजातींमध्ये आवाजमुक्त जीवन जगतात. विकसित जगातून त्यांना दोन गोष्टी हव्या असतात. आरोग्याच्या सुविधा जवळच असाव्यात, इंटरनेटची ठीकठाक स्पीड, जेणेकरून बाहेरील जगाशी संपर्क राहावा. ज्येष्ठ नागरिकांपेक्षाही आजचे तरुण जीवनाची गुणवत्ता व कमी भौतिक वस्तूंच्या शोधात आहेत. त्यांना मी ‘डू इट युवरसेल्फ’ पिढी म्हणतो.

एक पाइप किंवा बटण बदलण्यासाठी ते प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन नाही शोधत. ते प्रयोग करण्यासाठी तयार आहेत आणि स्वत: हळूहळू ते काम करतात. ते मेट्रो किंवा बस पकडण्यात घाई करत नाहीत तर जीवन हळू जगू इच्छित असतात. जगण्याच्या या सवयीचा परिणाम असा झाला आहे की, जी गॅजेट्स आणि मशीन्स ते आयुष्य सुखकर करण्यासाठी विकत घेत असत, त्यांनाही आता दीर्घायुष्य मिळू लागले. सोशल साइट्सवरही ते गॅजेट, भौतिक वस्तू किंवा चैनीच्या गोष्टी पोस्ट करत नाहीत, तर निसर्ग आणि प्रजातींवर लक्ष केंद्रित करत पोस्ट करत आहेत.

-फंडा असा की : तुम्ही जितके जास्त स्लो जीवनाकडे वाटचाल कराल, तितकेच तुम्ही तंत्रज्ञानाच्या फसवणुकीपासून दूर राहाल आणि निसर्गाला हानी पोहोचवण्याच्या दुष्परिणामांपासूनही दूर राहाल.

एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...