आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Technology Has Changed The Face Of The Entertainment Business; Disney's Market Value Has Halved To Rs 7 Lakh Crore

व्यवसाय:तंत्रज्ञानाने मनोरंजन व्यवसायाचे रूप पालटले; डिस्नेचे बाजारमूल्य निम्म्याने घटून7 लाख कोटी रुपये उरले

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिस्ने ही जगातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी २७ जानेवारीपासून आपले शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. सध्या कंपनी चढ-उताराच्या टप्प्यात आहे. तिचे बाजारमूल्य १४ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. बॉक्स ऑफिसवर तिचे साम्राज्य कायम आहे. २०२१-२२ मध्ये १२ महिन्यांत शेअरची किंमत दुप्पट झाल्याने गुंतवणूकदार कंपनीसोबत राहिले. यानंतर डिस्नेची घसरण सुरू झाली. गेल्या वर्षी जुन्या हॉलीवूड कंपन्यांचा शेअर बाजारातील वेग मंदावला. कोविड-१९ च्या आघातातून सिनेमा पूर्णपणे सावरलेला नाही. केबल व्यवसाय कमी होत आहे. डिस्नेच्या स्ट्रीमिंग विभागाला प्रत्येक तिमाहीत तोटा होत आहे. त्याला अॅपल आणि अॅमेझॉनचे आव्हान आहे. डिस्नेचे बाजारमूल्य २०२१ च्या शिखरापेक्षा निम्म्यावर आले आहे - सुमारे सात लाख कोटी रुपये. नोव्हेंबरमध्ये कंपनीने सीईओ बॉब चापेक यांना काढून टाकले आणि त्यांचे पूर्ववर्ती बॉब आयगर यांना सेवानिवृत्तीतून परत बोलावले. सक्रिय गुंतवणूकदार नेल्सन पेल्ट्झ यांनी आयगर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. वॉर्नर ब्रदर्स ते नेटफ्लिक्स अशा मनोरंजन कारखान्यांसमोरही डिस्नेसारखे संकट आहे. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे हॉलीवूडमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. १९२८ मध्ये स्ट्रीमबोट विली या मिकी माऊसच्या पहिल्या चित्रपटापासून व्हिडिओ मनोरंजनाचा स्फोट झाला आहे. टेलिव्हिजन, केबल, होम व्हिडिओ आणि नंतर इंटरनेटने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डिस्ने प्लसच्या सर्व स्ट्रीमिंगपेक्षा प्रत्येक तासाला यूट्यूबवर अधिक कंटेंट अपलोड केला जात आहे. लोक आता थिएटरमध्ये कमी जात आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. हॉलीवूड स्टुडिओ प्रेक्षकांना आकर्षित करतील अशा चित्रपटांवर सट्टा लावत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेतील टॉप टेन सिनेमे सिक्वेल किंवा फ्रँचायझी होते. टेक कंपन्या स्ट्रीमिंगमध्ये वापरले जाणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बनवत आहेत. सिलिकॉन व्हॅली हॉलीवूडपेक्षा मोठी आहे. अॅमेझॉनचा जाहिरात व्यवसाय डिस्नेच्या तिप्पट आहे. अॅपलसारख्या कंपन्यांकडे जोखीम घेण्याइतका पैसा आहे. नवीन तंत्रज्ञान तळागाळातील कंपन्यांना उज्ज्वल संधी देत ​​आहे. गेम इंजिनसारख्या शोधांमुळे व्हर्च्युअल सेटची निर्मिती झाली आहे. जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सने व्हिडिओ बनवणे सोपे केले आहे. तंत्रज्ञानाने मनोरंजनाची एक वेगळी श्रेणी निर्माण करून संस्कृतीचा व्यवसाय अत्यंत नाट्यमय पद्धतीने बदलला आहे. श्रीमंत देशांतील तरुण टेलिव्हिजनपेक्षा गेमिंगमध्ये जास्त वेळ घालवत आहेत. सिलिकॉन व्हॅली टेक कंपन्यांनी गेमिंगचा स्वीकार केला आहे. हॉलीवूडच्या महान सर्जनशील कारखान्यांना जगण्यासाठी बदलावे लागेल. डिस्नेने अंतहीन नवकल्पनेच्या आधारावर शंभर वर्षे काढली. त्याला नवे प्रयोग करत राहावे लागेल. डिस्नेच्या व्यवसायाचे अनेक मजबूत खांब कमकुवत झाले }डिस्नेच्या टीव्ही व्यवसायात नोव्हेंबरमध्ये ५% घट झाली. या आर्थिक वर्षात कंपनीच्या केबल नेटवर्क व्यवसायाच्या नफ्यात १७% ने घट होऊ शकते. }स्ट्रीमिंग व्यवसायाला सतत तोटा होत आहे. डिस्ने प्लसला गतवर्षाच्या शेवटच्या तिमाहीत १२,००० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. }अवतारचा सिक्वेल आणि इतर हिट येऊनही थिएटरमधील व्यवसाय हा महामारीपूर्वीच्या तुलनेत केवळ ६५% आहे. यंदाही सिनेमाचा व्यवसाय सामान्य राहील, असा अंदाज आहे. }डिस्नेच्या थीम पार्क व्यवसायाने पुनरागमन केले आहे. त्याला गेल्या वर्षी ५६ हजार कोटी रु. नफा झाला. कमाईच्या या स्रोतावर जास्त अवलंबून राहिल्याने नुकसान होऊ शकते, अशी काळजी कंपनीतील अनेकांना वाटते. }बॉब आयगर यांनी अनेक कंपन्या खरेदी केल्यामुळे डिस्नेवर ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी फॉक्स कंपनी पाच लाख कोटी रुपयांना विकत घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...