आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Tensions In China Taiwan Now After The Russia Ukraine War| Analysis By Manoj Joshi

विश्लेषण:रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर आता चीन-तैवानमध्ये तणाव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तैवानवर चीनने हल्ला केल्यास ते त्याच्या संरक्षणासाठी लष्करी कारवाई करतील, असे सांगून खळबळ उडवून दिली. मात्र, नंतर त्यांच्या प्रशासनाने या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. येथे अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल मार्क मायली यांनी सांगितले की, चीन नजीकच्या भविष्यात तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. आपण खात्री बाळगू शकता की, चीनने तैवानवर आक्रमण केले तर अमेरिका त्यात सहभागी होईल. कारण ग्वाम, पलाऊ आणि ओकिनावा येथील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केल्याशिवाय तैवानवर हल्ला करणे चीनला परवडणारे नाही. तैवानचे पंतप्रधान फुमियो किशिंदा यांनी म्हटले आहे की, युद्ध झाल्यास त्यांचा देश पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल आणि त्यांना जपानचाही पाठिंबा मिळू शकेल. जपानने अलीकडच्या काळात संरक्षण खर्चात दुप्पट वाढ केल्याने अमेरिका आणि चीननंतर तो जगातील तिसरा सर्वात मोठा संरक्षण बजेट खर्च करणारा देश झाला आहे. चीनने कोणत्याही प्रकारची कारवाई केल्यास त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये आधीच तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत असताना ही परिस्थिती आहे.

चीनचा कम्युनिस्ट पक्ष तो पीपल्स रिपब्लिक आॅफ चायना म्हणजे चीनचा एक प्रांत असल्याचा दावा करत असूनही गेल्या सत्तर वर्षांपासून रिपब्लिक ऑफ चायना किंवा आरओसी (१९१२ ते १९४९ पर्यंतचे तैवानचे अधिकृत नाव) एक स्वतंत्र देश म्हणून त्याचे अस्तित्व कायम ठेवले आहे. तैवान आतापर्यंत सुरक्षित राहिले, कारण चीन-तैवानच्या १८० किमी लांबीच्या आखातामुळे त्याच्यावर हल्ला करण्याची क्षमता चीनच्या कमकुवत नौदलात नाही. तैवानला जोडण्यासाठी लष्करी कारवाईची तयारी करणे हे चिनी सैन्याचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत तैवानच्या आसपास चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. या बेटावर चीनचे नौदल आणि हवाई दल गस्त घालत असते. चीनने अद्याप तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केलेला नाही, परंतु त्याने त्याच्या हवाई संरक्षण ओळख क्षेत्राचे उल्लंघन केले आहे.

तैवानची लोकसंख्या सुमारे अडीच कोटी आहे. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात ते क्विंग साम्राज्याचा भाग बनले. १८९५ मध्ये जपानी साम्राज्याने ते ताब्यात घेतले आणि येथे औद्योगिकीकरणाची प्रक्रिया सुरू केली. चियांग काई शेक यांच्या नेतृत्वाखालील आरओसीने प्रत्युत्तर दिले आणि जपानी सैन्याला आपली शस्त्रे खाली ठेवावी लागली. कम्युनिस्ट सैन्याने चियांग काई शेकचा पराभव केला तेव्हा त्याने फॉर्मोसा (तैवानचे जुने नाव) येथे आश्रय घेतला. त्यांचे दोन लाख समर्थक आणि अधिकारीही त्याच्यासोबत तेथे गेले. १९५० आणि १९६० च्या दशकात तैवानला चीन-अमेरिकेच्या संरक्षण कराराद्वारे संरक्षित केले गेले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात परदेशी मदत देण्यात आली. शीतयुद्धाच्या काळात बहुतांश पाश्चात्त्य देशांनी आरओसीला चीनचे सरकार मानले. पण, अमेरिकेने १९७९ मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे चीनचे एकमेव कायदेशीर सरकार म्हणून मान्यता दिली तेव्हा अनेक पाश्चात्त्य देशांनी तैवानशी संबंध तोडले. अमेरिका-फॉर्मोसा संरक्षण समझोता संपुष्टात आला. वॉशिंग्टन तैवानला लष्करी मदत देत आहे, परंतु चीनच्या कारवाईविरुद्ध लष्करी हस्तक्षेपावर मौन बाळगून आहे.

या काळात पोलाद, पेट्रोकेमिकल आणि जहाजबांधणी उद्योगांमुळे तैवान एक औद्योगिक पॉवरहाऊस म्हणून उदयास आले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये त्याने नैपुण्य मिळवले आणि जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक बनले. तेथे लोकशाहीचा उदय झाला आणि २००० सालापर्यंत तो संपूर्ण लोकशाही देश बनला. तैवान आपला भाग असल्याचा दावा चीन नेहमीच करत आहे आणि त्याला शांततापूर्ण मार्गाने जोडायचे आहे, परंतु गरज पडल्यास बळाचा वापर करण्यास त्याची हरकत नाही. २०२० मध्ये तैवानची निर्यात ३४५ अब्ज डाॅलर, तर भारताची निर्यात फक्त २७६ अब्ज डाॅलर होती. तैवान चीनला सर्वाधिक निर्यात करतो. त्यांची टीएमएससी कंपनी ही जगातील सर्वात मोठी चिपमेकर आहे. ती सॅमसंग आणि इंटेललाही हेवा वाटेल अशा दर्जाच्या चिप्स बनवते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मनोज जोशी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे प्रतिष्ठित फेलो

बातम्या आणखी आहेत...