आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Answers To The Questions Related To The Earth Are All Around Us | Article By Dr. Anil Prakash Joshi

दृष्टिकोन:पृथ्वीशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही आपल्या आजूबाजूलाच असतात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण दिन झाला, परंतु पृथ्वीची स्थिती अशी आहे की दिन आणि समारंभांनी काहीही होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ठोस पावले उचलली पाहिजेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या यंदाच्या पर्यावरण दिनाची थीम ‘ओन्ली वन अर्थ’ आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण असलो तरी पृथ्वी आपली काळजी घेईल हे निश्चित. निसर्गाची देणगी असलेल्या हवा व मातीशिवाय आपण जगू शकत नाही आणि यासंदर्भात आपल्या देशाचा विचार नेहमीच अग्रभागी राहिला आहे.

निसर्गाचे महत्त्व समजून घेऊन आपण नेहमीच पृथ्वीची पूजा केली. शास्त्रात म्हटले आहे- ‘समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिते। विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे’ म्हणजे ‘विष्णु पत्नी पृथ्वी, तुझ्या कुशीत समुद्र आणि पर्वत आहेत आणि मी तुझ्यावर पाय ठेवत आहे म्हणून मी क्षमा मागतो.’ निसर्ग आणि पृथ्वीबद्दल आपल्या शास्त्रात ही भावना होती. आणि त्याच पृथ्वीला समजून घेण्यासाठी आणि समजावून देण्यासाठी आज संयुक्त राष्ट्र त्या मार्गावर आहे, जे ज्ञान भारतीय शास्त्रांनी आणि धर्मग्रंथांनी शतकानुशतके दिले होते.

आपण पृथ्वीला केवळ आपलीच मानली नाही, तर सर्व प्रकारच्या जीवसृष्टीला तिचा वाटेकरी आणि भागीदार मानले. त्यात धर्माचे अस्तित्व होते. तसे नसते तर दुर्गेची स्वारी सिंहाची झाली नसती. गणेशाचा हत्तीशी संबंध नसता. समुद्राचा रक्षक आणि अजगराला विष्णूच्या शयनात जागा मिळाली नसती. हनुमान हा पवनपुत्र असण्यामागील जीवनशक्ती समजून घेतली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सर्व प्राणी, पक्षी किंवा इतर प्राण्यांची देव-देवतांशी वेगवेगळ्या प्रकारे संगती दिसली नसती. या सगळ्यामागे एकच विश्वास होता की, पृथ्वीवर सर्व प्रकारच्या जीवांना समान स्थान आहे. या माध्यमातून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, केदारनाथमधील हिमनगांवर भगवान शंकर वास करत असतील तर ते त्यांचे पालकही आहेत आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू हे केवळ समुद्राचे निवासी नाहीत, तर रक्षकही आहेत. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण गोपाळांसोबत जंगलात फिरून जंगलांचे प्रतिनिधित्व करतात.

शास्त्रांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते, जेणेकरून आपण निसर्गाचा इतर सजीवांशी आणि विविध उत्पादनांशी गंभीरपणे संबंध ठेवू शकू, हे स्पष्ट आहे. नद्यांना माता म्हणायचे. पर्वत आणि हिमालय यांना संरक्षक मानले तर हे सर्व या देशातच अस्तित्वात आहेत. निसर्ग आणि पृथ्वीबद्दल आपण काय बोललो आणि समजलो, काय म्हणालो आणि का म्हणालो, ते पुन्हा एकदा शोधून काढले पाहिजे. आपण आपल्या संस्कृतीपासून दूर गेलो आहोत.

हवा-माती-पाणी शुद्ध नसेल, माती विषारी असेल तेव्हा जीवन समृद्ध कसे मानता येईल? सर्वाधिक प्रदूषित शहरे आपल्याच देशात आहेत. हे गंभीर प्रश्न निर्माण करते आणि चिंतन करण्यास भाग पाडते. आयपीसीसीच्या अहवालात सर्व काही बिघडत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पण, आपण आपल्या संस्कार संस्कृतीची चर्चा जगात करून निसर्गाने शिकवलेले व निसर्गाच्या संरक्षणाचे साधन असलेले नवे प्रयोग करून पाहावेत, अशी ही एक संधी आहे. आपल्या संस्कृतीने संवर्धनाची शिकवण दिली. आता आपल्याला तीच मूल्ये परत समजून घ्यायची आहेत, ज्याद्वारे निसर्ग आपल्यालाही सावरेल आणि आपणही. निसर्गाबद्दलचे आपले ज्ञान आणि समज जाणून घेण्याची हीच वेळ आहे.

(ही लेेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डाॅ. अनिल प्रकाश जोशी पद्मश्रीने सन्मानित पर्यावरणवादी dranilpjoshi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...