आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:कंटाळवाणेपणाचे फायदे!

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईवरून विमानाने जाताना विंडो सीटजवळ बसल्याच्या तीन मिनिटांनंतरच एक जण माझ्याजवळच्या सीटवर आला आणि बॅग फेकली. दुसरी बॅग शोधण्यासाठी तो रॅकवर जागा शोधत होता. जागा नसल्याने त्याने बेल वाजवून एअरहोस्टेसला बोलावले आणि येथे बॅग ठेवण्याचीही जागा नसल्याचे सांगितले. एअरहोस्टेसने शांतपणे बॅग घेतली आणि बिझनेस क्लासमध्ये ठेवली. यानंतर त्याने लॅपटॉप बॅग काढत माझ्याजवळच्या सीटवर झटक्याने बसला. त्यामुळे धस्स आवाज झाला. जणू काही वाफेचे इंजिन स्टेशनवर येऊन थांबले. त्या आवाजाने माझ्यासह इतर प्रवासीदेखील त्रासिक झाले. कारण तो एक उद्धट प्रवासी होता.

सीटवर बसल्यानंतर तो बडबड करू लागला. मी रोज-रोज विमानाने प्रवास करून कंटाळलो. खरं तर रोज प्रवास करणारा माणूस अशा प्रकारे वागत नाही. त्याची परेशानी पाहून मी म्हणालो, “आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की, आपण जीवनातील कंटाळा दूर केला पाहिजे. पण कंटाळवाणेपणा आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे संशोधनातून दिसून आले. आता त्याला या विषयात रस निर्माण झाला आणि तो माझ्याशी बोलू लागला. माझी कल्पना सोपी होती.’

आपल्या ‘बोर्ड अँड ब्रिलियंट’ पुस्तकात मनाउश जोमोर्दी म्हणतात, ‘आपला मेंदू जेव्हा इतरत्र भटकतो तेव्हा आपण ‘डिफॉल्ट मोड’ अॅक्टिव्हेट करतो. येथे आपण आपल्या समस्या सोडवतो, आपल्या सर्वोत्तम कल्पना मांडतो आणि “आत्मचरित्रात्मक नियोजन’मध्ये गुंततो. अशा प्रकारे आपण जगाची आणि आपल्या ध्येयांची समज विकसित करतो, असे त्या म्हणतात. सेंट्रल लँकेशायर विद्यापीठातील क्लासिक प्रोफेसर डॉ. सँडी मान यांनी नुकतेच केलेल्या प्रयोगात, कंटाळवाणेपणाचा काळ आपल्या भूतकाळातील विचारांना चालना देऊ शकतो, असा धक्कादायक परिणाम सुचवतो. त्याच्या प्रयोगात सामील असलेल्या गटाचे जीवन अडथळ्यांनी भरलेले होते आणि त्यातून त्यांनी स्वतःचे काल्पनिक विश्व निर्माण केले. कॅल्गेरी विद्यापीठाचे क्लासिक प्रोफेसर पीटर टुहे आपल्या ‘बोर्डम अ लाइव्हली हिस्ट्री’ पुस्तकात म्हणतात, कंटाळवाणेपणाचे दोन प्रकार आहेत. परिस्थितीमुळे निर्माण झालेले आणि अतिप्रचंडतेमुळे उद्भवणारे. पहिला म्हणजे लांब आणि नीरस बैठका किंवा लांब कार चालवण्यासारख्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला कंटाळा. दुसरा म्हणजे, जास्त खाणे, मद्यपान करणे किंवा त्याच त्या बाबींची पुनरावृत्ती केल्याने उद्भवणारा कंटाळवाणेपणा.’ पीटर म्हणतात, “कंटाळवाणेपणा आपल्याला दुखावणारी सामाजिक परिस्थिती टाळून आपले संरक्षण करतो.’ अवा हाफमनने तिच्या “हाऊ टू बी अ बोर्ड’ या पुस्तकात डिजिटल आणि स्पर्धात्मक जगात व्यवसाय संस्कृती कशी विकसित होते आणि आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास वेळ देत नाही याचे वर्णन केले आहे. कंटाळा आल्यावर आपण तो वेळ काढू शकतो. अवा म्हणते, जेव्हा आपले मन भरकटते आणि आपल्यामध्ये चीड निर्माण करते तेव्हा ते आपल्याला चिंतन, ध्यान यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींकडे घेऊन जाते.

आपल्याला आध्यात्मिकरीत्या जागरूक बनवण्यास सक्षम करते आणि आपले जीवन अधिक समृद्ध आणि अधिक उदार बनते.’ इतर संशोधनातून कंटाळवाणेपणा हा सामाजिक वर्तन आणि इतरांना देण्यासारख्या ताजेतवाने परिणामांशी संबंधित

असल्याचे सूचित होते.
- फंडा असा की, “मला कंटाळा आला’ असे कुणी म्हणत असेल तर त्यांना सांगा, तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्याचा मार्ग सापडला. कारण त्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळाला.

एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...