आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Burden Of Lifeless Power Will Continue To Flow On Those Who Do Not Recognize The Truth | Article By Navneet Gurjar

वृत्तवेध:जोवर सत्य ओळखणार नाहीत तोवर असेच वाहत राहू निर्जीव सत्तेचे ओझे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारण हा खोट्याचा खेळ आहे, असे म्हणतात. सत्य ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्याच्या हातात खेळत राहाल. राजकीय पक्षांबाबत बोलायचे तर, ते तिरडीसारखे आहेत. तिरडी वाहून नेताना जसा एक खांदा थकला की आपण खांदा बदलतो, पण यामुळे तिरडीचे वजन कमी होत नाही. ते तेवढेच राहते. फक्त खांदा बदलल्याने थकलेल्या खांद्याला विश्रांती मिळते आणि न थकलेला खांदा त्या तिरडीचा भार सहज पेलू शकतो. राजकारणातही असेच घडते. सत्ता बदलून आपण समजतो की भार हलका झाला आहे, परंतु तसे होत नाही. राजकारणातील खोटे-खरे ओळखल्याशिवाय कपटी नेत्यांपासून सुटका होणे अशक्य आहे.

असो, मुद्दा झारखंडबद्दल आहे. तिकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले. याबाबतचा निर्णय राज्यपालांनी घ्यायचा आहे. आठवडा उलटून गेला. ते कागद दडवून बसले आहेत. कदाचित एखादी संधी शोधत असावेत. ...की केव्हा सोरेन गट कमकुवत होतो आणि केव्हा पाने उघडता येतील.

याच भीतीमुळे महाआघाडीचे म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चाचे ३०, काँग्रेसचे १६ आणि राजदचा एक असे सर्व आमदार इकडे-तिकडे फिरत आहेत. फिरत आहेत नव्हे, त्यांना फिरवले जात आहे. आता त्यांना रायपूरला आणले जात असल्याचे ऐकले आहे. कदाचित पोहोचलेही असतील. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने त्यांना येथे कोणताही धोका होणार नाही, असे मानले जात आहे. प्रश्न असा आहे की, त्यांना धोका कोणापासून आहे? वास्तविक, शक्तिशाली पक्षापासून ते इकडे तिकडे धावत फिरतात, पण त्यांना खरा धोका स्वतःपासूनच असतो. म्हणजे आमदारांकडून त्यांच्याच पक्षाला धोका! पक्षांचा त्यांच्यापैकी कोणावरही विश्वास नसतो. कधी, कोण, कितीमध्ये विकले जाईल माहीत नाही! आणि हेच सगळे उद्या राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि आणखी काय काय होणार असतात. पैशासाठी किंवा पदासाठी जे केव्हाही कोणासाठीही विकायला तयार असतात, ते मंत्री होऊन किंवा सरकारमध्ये पद मिळवून प्रामाणिकपणे जनतेची सेवा करू शकतील का, याचा अंदाज बांधता येतो!

खरे तर झारखंडमध्ये महाआघाडीचे ४७ आमदार आहेत. म्हणजे बहुमतापेक्षा पाच अधिक. तरीही त्यांना फुटण्याची भीती आहे की भाजपचे भूत येऊन काहींचे अपहरण करू नये. दुसरीकडे भाजपकडे सत्ता मिळवण्याचा एकच मार्ग आहे, काँग्रेसचे दोनतृतीयांश म्हणजे किमान दहा आमदार फोडणे. यानंतरही आणखी एक-दोघांची बेगमी करावी लागेल. हेमंत सोरेन यांना आतापर्यंत अपात्रतेचे पत्र न देण्याचे कारण हेच समजले जात आहे की, आतून काही जुगाड केला जात असावा.

मात्र, राज्यपालांना त्यांच्या अपात्रतेच्या पत्रावर त्यांना पाहिजे तेव्हा निर्णय देण्याचा अधिकार आहे. वाटले नाही तर सांगणारही नाहीत. परंतु, सोरेन यांच्याविरुद्धच्या तपासात इतकी तत्परता दाखवली गेली, तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर जॅम का लावला गेला? राज्यपाल कदाचित कायदेतज्ज्ञांशी विचारविनिमय करत असावेत, म्हणजे करतच असतील. पण असा कोणता विचारविनिमय, असा कोणता सल्ला आहे की, एका आठवड्यानंतर अद्याप पूर्ण होऊ शकला नाही?

असो, हा सत्तेचा खेळ आहे. म्हणजे खोट्याचा खेळ. जोपर्यंत लोक तो ओळखत नाहीत तोपर्यंत हे असेच सुरू राहील. बलाढ्य पक्ष इतर पक्षांचे आमदार विकत घेत राहतील. आमदार विकले जात राहतील. खोट्याचा भ्रम जागृत राहील. फसवणुकीचे सामर्थ्य वाढतच राहील आणि जे आमदार आजवर विकले गेले नाहीत ते पैशाच्या चकाकीच्या भीतीने इकडे तिकडे धावत राहतील. कधी रांची, तर कधी रायपूर….

नवनीत गुर्जर नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर navneet@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...