आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त मातृदिनाचे:मुलाला भविष्यासाठी तयार करायला हवं

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

म ला टीव्ही बघायला फार आवडत नाही पण ‘इपिक’नावाचं चॅनल मी, माझा नवरा प्रेषित आणि मुलगा स्वयंम आवर्जुन बघतो. आवडीने बघतो. कारण या चॅनेलवर काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या लॉस्ट रेसिपीज आणि राजदरबारात जे काही अन्न शिजवलं जायचं त्याबद्दलची खूपसारी माहिती मिळते. त्या सगळ्या रेसिपीज सहजरित्या आपल्याला बघता येतात. आज स्वयंम १५ वर्षांचा आहे. स्वयंपाक शिकून घेण्यामध्ये त्याने दाखवलेल्या आवडीमध्ये कुठे ना कुठे आमचं सहकुटूंब ‘इपिक’ पाहण्याचा वाटा नक्कीच आहे असं वाटतं.

कारण लहानपणापासून टीव्हीवर त्याला कार्टूनपेक्षा फूड चॅनेल बघायला जास्त आवडायचं. स्वयंमची स्वयंपाकाची आवड डेव्हलप होण्यात माझ्यापेक्षा त्याचे वडील प्रेषित आणि त्याचा मामा आदित्य यांचाही मोलाचा वाटा आहे. कारण या दोघांनाही स्वयंपाकाची,नवनवीन पदार्थ करून बघण्याची प्रचंड आहे. ओघानंच पुरूषांनी स्वयंपाक घरात जाऊन काम करणं हे स्वयंमसाठी काही नविन किंवा वेगळी गोष्टी कधीच नव्हती.तो हे सगळं लहानपणापासून बघत आलाय. मी गायिका आहे. गाण्यांच्या मैफिलींच्या निमित्ताने मी अनेकदा बाहेरगावी दौऱ्यावर जात असते. नवरा प्रेषित सुद्धा त्याच्या ऑफिसच्या कामात व्यस्त असतो. स्वयंम आठ वर्षांचा असताना त्याला आवडणारी मॅगी त्याने सर्वप्रथम बनवली होती. त्यावेळी मी घरी नव्हते. पण मॅगी व्यवस्थित बनवून, गॅस काळजीने हाताळून त्याने मॅगी बनवली आणि माझ्यासाठीपण शिल्लक ठेवली होती. गॅस एकट्याने हाताळल्याबद्दल मी घरी आल्यावर त्याला रागवले खरी, पण मग हळूहळू तो मी असताना देखील वेगवेगळे, सोप्या कृतींचे पदार्थ बनवायला लागला. जेणेकरून त्याचे त्याला व्यवस्थित पोटभरीचे होऊ शकेल. सॅंडविच, पोळी पिझ्झा, विविध प्रकारचे मिल्क शेक, कोल्ड कॉफी, ऑम्लेट, बटाट्याची सुकी भाजी हे त्याने वयाच्या नऊ- दहा वर्षापासून बनवायला सुरूवात केली होती. आज तो पंधरा वर्षाचा आहे, आता तो कुकर लावणं, चॅनवर बघितलेल्या सोप्या पाककृती करणं आणि आमच्यासाठीही शिल्लक ठेवणं हे सगळं शिकलाय.

सुरुवातीला मला वाटलं की आपण त्याला फारच कमी वयात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत की काय? पण मग असा विचार केला की येणारं युग खूप वेगळं असणार आहे. शिक्षण किंवा इतर कारणांमुळे घरापासून लांब राहणाऱ्या मुलांचं काहीही अडायला नको असं वाटत असेल तर त्यांना स्वावलंबी बनवणं अत्यावश्यक बनलं आहे. आपण स्वत:च्या हाताने बनवलेला पदार्थ आई-बाबांना खायला द्यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा, त्यांची शाबासकी मिळवावी या आनंदाचा अनुभव मुलांना घ्यायचा असेल तर प्रत्येक आईने मुलाला स्वयंपाक शिकवायलाच हवा.

शीतल रुद्रवार संपर्क : ९३२५२२७९७०

बातम्या आणखी आहेत...