आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Elder Died While Searching For The Younger Brother Who Was Separated During Partition, Now Both The Families Have Met

दिव्य मराठी विशेष:फाळणीवेळी विभक्त लहान भावाला शोधताना मोठ्याचे झाले निधन, आता दोन्ही कुटुंबे भेटली

लाहोरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिखांचे पवित्र तीर्थस्थळ कर्तारपूर साहिब विभक्त झालेल्यांची पुन्हा भेट होण्याचेही क्षेत्र ठरले आहे. १९४७ च्या फाळणीवेळी विभक्त झालेल दोन भावांचे कुटुंब गुरुवारी कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये भेटले. वर्षभरापूर्वी दोन भाऊ येथे भेटले होते. या वेळी शीख भाऊ गुरदेवसिंग आणि दयासिंग यांच्या कुटुंबाचे मिलन झाले आहे. ते हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील गोमला गावचे रहिवासी आहेत.

दोघे भाऊ विभाजनाआधी आपल्या दिवंगत पित्याचे मित्र करीम बख्श यांच्यासोबत राहत होते. विभाजनानंतर करीमसोबत मोठा भाऊ गुरदेवसिंग पाकिस्तानात गेले. लहान भाऊ दयासिंग आपल्या मामासोबत येथे राहत होते. पाकिस्तानात पोहोचल्यावर पंजाब राज्यात लाहोरपासून २०० किमी दूर झांग जिल्ह्यात गेले. त्यांनी गुरदेवसिंग यांचे नाव गुलाम मोहंमद ठेवले. गुरदेवसिंग यंाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आणि लहान भावाला भेटण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. गुरदेवसिंगांचा मुलगा मोहंमद शरीफ यांनी सांगितले की, भारत सरकारला पत्र पाठवले आणि दयासिंग यांना शोधण्यासाठी मदत मागितली. खूप प्रयत्न केल्यानंतर दयासिंगची माहिती मिळाली. यानंतर दोन्ही कुटुंबांनी कर्तारपूर साहिब येथे भेटण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी त्यांची भेट झाली.

गेल्या वर्षीही हबीब आणि मोहंमद भेटले होते गेल्या वर्षीही फाळणीवेळी विभक्त झालेले दोन भाऊ पाकिस्तानचे ८० वर्षीय मुहंमद सिद्दिकी आणि भारतातील ७८ वर्षीय हबीब जानेवारी २०२२ मध्ये कर्तारपूर कॉरिडॉरमध्ये भेटले होते. कर्तारपूर कॉरिडॉर व्हिसा-मुक्त धार्मिक ठिकाण असून ते पाकिस्तानात गुरुद्वारा श्री दरबार साहिब आणि भारतात गुरुद्वारा श्री डेरा बाबा नानक यांना जोडतो. या कॉरिडॉरमधून भारतीय भाविक व्हिसाशिवाय कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...