आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:कर्मबीजाचे शत्रू आहेत दुर्गुण

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमंतांची गरिबीही श्रीमंत असते, गरिबांची श्रीमंतीही गरीब असते. गरीब-श्रीमंत हा भेद शतकानुशतके चालत आला आहे आणि पुढेही चालू राहील. त्यामुळे त्यांच्यासाठी नवी रूपे शोधली पाहिजेत. एखाद्याला मदत करणे हीदेखील श्रीमंती आहे. निरुपयोगीपणा ही एक गरिबी आहे. कष्टाळू लोक ध्येयाच्या शोधात भटकताना आढळले तर त्यांना अवश्य मदत करा. घरातून बाहेर न पडणाऱ्या म्हणजे आळशी, निरुपयोगी, कामचुकार भरकटलेल्यांपेक्षा ते चांगले असतील.

गरिबीतून वर यायचे असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर कृतीला बीज माना. नशीब आणि परिश्रमाचा परिणाम पाहायचा असेल तर बियांचे उदाहरण खूप चांगले आहे. बीज नापीक जमिनीवर, बांधावर पडले किंवा शेतात टाकले तर त्याचे परिणाम वेगवेगळे असतील. शेतातील तण हा बियांचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे आजूबाजूचे गवत बीजाचे नशीब खाऊन टाकते. याप्रमाणेच दुर्गुण आपल्या कर्मबीजांचे शत्रू आहेत. कर्माचे बीज दुर्गुणांच्या गवतापासून वाचवा. मनुष्य कर्मानेही श्रीमंत किंवा गरीब होऊ शकतो. सत्कर्म केवळ श्रीमंतीच्या श्रेणीत येतात. Facebook:Pt. Vijayshankar Mehta पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com

बातम्या आणखी आहेत...