आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Entertainment Of The Future Is Going To Be Virtual| Article By N. Raghuraman

मॅनेजमेंट फंडा:भविष्यातील मनोरंजन आभासी होणार आहे

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच मी माझ्या आवडत्या तीन खेळण्यांपैकी एका डबल डेकर बसविषयी लिहिले होते. बस मी बरीच वर्षे सांभाळून ठेवली होती. बऱ्याच वाचकांनी मला विचारले, बाकीची दोन खेळणी कोणती होती. वाचकांचे पत्र मला शनिवारी आठवले, जेव्हा मी इसिगाई आयडाॅल (Isegye Idol) विषयी ऐकले. मुलींचा हा आभासी ग्रुप म्युझिक चार्टमध्ये टॉपवर पोहोचला आहे. कोरियामध्ये एका ऑनलाइन पर्सनॅलिटीने ऑगस्ट २०२१ मध्ये तो बनवला होता, ते स्वत:ला वुवाकगुड (Woowakgood) म्हणतात. ते यू-ट्यूब आणि ट्विचवर गेम खेळताना स्वत:ला प्रसारित करतात.

‘रिवाइंड’सह डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी पदार्पण केले होते, ते स्थानिक म्युझिक चार्टमध्ये नंबर वनवर गेले होते. इसिगाई आयडाॅलचे सदस्य पूर्णपणे व्हर्च्युअल नाहीत. त्या मेटाव्हर्स पिक्सल्सच्या मागे मानवी प्रतिभा लपलेली आहे, त्याचा आवाज-व्यक्तिमत्त्व खऱ्या कलाकारांसारखं वाटतं. वुवाकगुड ऑडिशन्सला आपल्या यू-ट्यूब व ट्विच चॅनलवर पोस्ट करते आणि चाहत्यांना मतदानाची परवानगी देते; जेणेकरून शेवटच्या सदस्याची निवड होऊ शकेल.लहान मुलांसाठी खेळण्यांसह खेळणे हा एक मजेदार मार्ग असू शकतो, परंतु मुलांचे मनोरंजन पिढ्यान‌्पिढ्या बदलत असते.

त्या दिवसांत माझ्या काकांनी मला माझ्याकडे असलेली खेळणी कुणी आणली, त्यांचा शोध कुणी लावला, ती कुठे बनवली आणि त्याची किंमत काय, सगळे जाणून घ्यायला शिकवले होते. त्यांनी खेळण्यांबद्दल प्रथम माहिती गोळा केली होती, त्यामुळे मलाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. माझ्याकडे जास्त माहिती असल्यामुळे ‘मि. पोटेटो हॅड’ माझे दुसरे सर्वात आवडते खेळणे होते. पूर्ण कुटुंबातून पहिल्यांदाच अमेरिकेत जाणारे माझे अंकल घेऊन आले होते. ‘मि. पोटेटो हेड’ला अमेरिकेच्या जॉर्ज लर्नरने १ मे १९५२ ला लाँच केले होते. याची किंमत एका डॉलरपेक्षा कमी होती. पहिल्याच वर्षी दहा लाखांपेक्षा जास्त खेळणी विकली गेली आणि त्याचे निर्माते हॅसब्राे यांनी दावा केलाय की, हे खेळणे ७० वर्षांनंतर सर्वात जास्त विकले जाते. १९६४ नंतर पहिल्यांदा एखादे खेळणे म्हणजेच मि. पाेटेटोंचे टीव्ही-वर्तमानपत्रात जाहिराती आल्यानंतर याविषयी माझा लळा आणखी वाढला. त्यानंतर अनेक अमेरिकी चित्रपटांत ते एक पात्र बनले आणि माझे आणखी आवडते झाले.

तिसरे आवडते खेळणे ‘टेडी बिअर’ होते, माझ्या मुलीलाही ते आवडायचे. त्याचे नाव अमेरिकेचे राष्ट्रपती थिआेडाेरच्या ‘टेडी’ रूझवेल्टच्या नावावर पडले. शिकार करायला गेलेल्या टेडीने बांधलेल्या अस्वलांच्या पिलाची शिकार करण्यास नकार दिला. आपल्या पिढीपेक्षा उलट माझ्या मुलीच्या पिढीला खेळ्ण्यात काही तरी रचनात्मक हवे आहे. त्यामुळेच तिला ब्लॉक आणि रूबिक क्यूब आवडतात. लेगोला डेन्मार्कचे ब्लॉक बनवणारे दिग्गज आणि रूबिक क्यूब हंगेरीच्या एनो रूबिकने १९७४ मध्ये संशोधन केले होते. त्याला ते सुरुवातीला मॅझिक क्यूब म्हणत होते.

ज्या पिढीला ब्लॉक्स-क्यूब आवडत होते, त्यांना आता व्हर्च्युअल खेळ आवडू लागल्याचे नवल वाटते. आजकाल अनेक व्हर्च्युअल ग्रुप बनत आहेत. व्हर्च्युअल सिरीज पाहून लोक पुढचे ट्रेंडिंग सेलिब्रिटीज निवडत आहेत, ऑनलाइन स्ट्रीम करणारे लोक यात भूमिका करत आहेत. यात सर्वात आवडता इसिगाई आयडॉल हा व्हर्च्युअल ग्रुप आहे आणि आवडत्या पात्राला मत देऊन मुले स्वत:ला दमदार समजत आहेत. सहासदस्यीय इसिगाई आयडॉलच्या यशावरून सायबर सेलिब्रिटीची वेळ आल्याचे जाणवते आणि मेटाव्हर्स मनोरंजनच्या जगात सर्वात यशस्वी ठरू शकते. कोरियाची मनोरंजन कंपनी एसएम, जेवायपी, वायजी आणि एचवायबीई मेटाव्हर्सच्या जगात गुंतवणूक करत आहेत आणि अब्जावधी रुपये कमवत आहेत.

एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...