आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:कोरोनामुळे झालेले आर्थिक -मानसिक परिणाम गंभीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका तिमाहीत जीडीपी दर मागील वर्षाच्या संबंधित तिमाही किंवा रिझर्व्ह बँक/स्टेट बँकेच्या अंदाजापेक्षा कमी होता, हे महत्त्वाचे नाही. कोरोना संकटाच्या अडीच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना आणि कोट्यवधी लोक बेरोजगार झाले असताना या काळात एका उद्योगपतीचे भांडवल तेरापट कसे वाढले, हाही चिंतेचा विषय नाही. दर एक लाख लोकसंख्येमागे आत्महत्यांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत सातत्याने का वाढत आहे, यावर विचार करावा लागेल. एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीवरून दिसून येते की, रोजंदारी करणाऱ्यांमध्ये ही प्रवृत्ती गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढून २०२१ मध्ये एकूण आत्महत्यांपैकी २५.०६% झाली आहे. याहूनही चिंताजनक बाब म्हणजे २०२० मधील राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत २०२१ मध्ये सर्व गटांमधील आत्महत्यांची टक्केवारी ७.१७ ने वाढली असली तरी रोजंदारी कामगारांच्या श्रेणीमध्ये ती ११.६ ने वाढली आहे. या तीन वर्षांत शेती करणाऱ्यांमध्ये ही संख्या कमी झाली आहे, पण शेतमजुरांमध्ये हा कल वाढला. अर्थव्यवस्था सुधारली तर त्याचे फायदे उच्च वर्गापुरते मर्यादित राहू नयेत, हे सरकारने पाहावे. अर्थव्यवस्था मजबूत होऊनही गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढतच गेली आणि गरिबांना जीवनावश्यक गोष्टींपासूनही वंचित ठेवले गेले, तर त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. या वर्गासाठी नवीन कल्याणकारी योजना राबवाव्या लागतील.

बातम्या आणखी आहेत...