आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The First Election Was Won By A Record Margin, The Second Election Won A Record Number Of Seats

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - भूपेंद्रभाई रजनीकांत पटेल:पहिली निवडणूक विक्रमी फरकाने जिंकली, दुसऱ्या निवडणुकीत मिळवल्या विक्रमी जागा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म : १५ जुलै १९६२, अहमदाबाद शिक्षण : शासकीय पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंग में डिप्लोमा कुटुंब : पत्नी-हेतल पटेल, मुलगा- अनुज पटेल, मुलगी-सुहानी। मालमत्ता : सुमारे ५ कोटी रु., २०१७ च्या निवडणूक शपथपत्रानुसार

वर्ष होते २०१७. आनंदी बेन पटेल मध्य प्रदेशच्या राज्यपाल झाल्या तेव्हा त्यांनी अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. ही निवड धक्कादायक नव्हती, पण भूपेंद्र यांचा विजय चकित करणारा होता. भूपेंद्र यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला. २०१७ च्या निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय होता. आणखी एक रंजक गोष्ट... भूपेंद्र यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. भूपेंद्र पटेल यांची प्रतिमा प्रामाणिक व स्वच्छ आहे. ते खूप लो प्रोफाइल राहतात. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला तेव्हा हायकमांड भूपेंद्र यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. राजीनाम्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी गांधीनगरच्या भाजप मुख्यालयात भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा त्यांना शोधण्यासाठी कार्यकर्त्यांना पाच मिनिटे लागली. आज जाणून घ्या… आपल्या दुसऱ्याच निवडणुकीत भाजपला भरघोस जागा मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याबद्दल….

अहमदाबादमधून आमदार झालेले एकमेव मुख्यमंत्री प्रारंभिक जीवन : सरकारी शाळेत शिक्षक होते वडील भूपेंद्र पटेल यांचा जन्म अहमदाबादच्या शिलाज गावात झाला. शिलाज हे अहमदाबादच्या पश्चिम उपनगरातील निवासी क्षेत्र आहे. त्यांचे वडील रजनीकांतभाई पटेल हे शिक्षक होते. ते सरकारी शाळेत शिकले. अहमदाबादच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. शिक्षणानंतर त्यांनी सुमारे तीन वर्षे खासगी बांधकाम कंपनीत काम केले. यानंतर त्यांनी आठ मित्रांसह बांधकामाला सुरुवात केली. किशोरवयातच रा. स्व.च्या प्रभावाखाली भूपेंद्र यांनी संघटनेचे सदस्यत्व घेतले. त्यांची विहान असोसिएशन नावाची एक बांधकाम कंपनी आहे, ती त्यांचा मुलगा आणि सून सांभाळतात.

राजकीय कारकीर्द : नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास

भूपेंद्र पटेल यांनी महापालिका निवडणुकीपासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. पटेल हे मेमनगर नगरपालिकेचे अनेक वेळा सदस्य होते. ते अहमदाबाद महानगरपालिकेचे उपाध्यक्षही होते. त्यानंतर २०१० ते २०१५ पर्यंत ते थलतेज प्रभागाचे नगरसेवक होते. ते २०१० ते २०१५ या काळात अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. पक्षाने त्यांना २०१५ मध्ये अहमदाबाद शहर विकास प्राधिकरण (एयूडीए) चे अध्यक्ष केले. ते दोन वर्षे अध्यक्षही होते. या वेळी त्यांनी शहराच्या विकासात शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या. २०१७ मध्ये आनंदीबेन यांच्या सूचनेनुसार त्यांना विधानसभेचे तिकीट दिले, त्यात ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. २०२१ मध्ये मुख्यमंत्री होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल कधीही मंत्री नव्हते. नरेंद्र मोदी यांच्यप्रमाणेच त्यांचे आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी मोदी कधीही मंत्री नव्हते.

एकेकाळी फटाके विक्रेते म्हणून सुरू केला होता व्यवसाय { भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादच्या दरियापूर भागात फटाके विक्रेते म्हणून व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपला ठसा उमटवला. {अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या त्यांच्या कार्यकाळातच बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (बीआरटीएस) आणि साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाचा मोठा भाग पूर्ण झाला. {भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजातील कडवा पटेल उपजातीतील आहेत. कडवा पटेलांच्या माँ उमिया या सर्वात मोठ्या धार्मिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. { अहमदाबाद मतदारसंघातून आमदार असलेले गुजरातचे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. उर्वरित १६ मुख्यमंत्र्यांपैकी एकही अहमदाबादचा नाही. { भूपेंद्र पटेल हे आध्यात्मिक गुरू दादा भगवान यांच्या ‘अक्रम विज्ञान आंदोलन’चे अनुयायी आहेत. त्यांना क्रिकेट आणि बॅडमिंटन पाहण्याची आवड आहे.

बातम्या आणखी आहेत...