आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Future Of Women In The Entertainment World Is Certainly Hopeful | Marathi Article By Monica Shergill

यंग इंडिया:मनोरंजन विश्वातील महिलांचे भविष्य नक्कीच आशादायक आहे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या कथा निर्मात्यांसाठी आणि अधिक कथांचा आनंद घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात अनेक कथा आहेत. नवे असोत की अनुभवी कथाकार असोत, सर्व जण अतिशय सर्जनशील पद्धतीने कथा लिहीत करत आहेत. प्रेक्षकदेखील नवीन शैलींचा प्रयोग आणि शोध घेत आहेत. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी सादर केलेला आवाज ऐकण्यासाठी, कथा पाहण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याची विलक्षण क्षमता आता आपल्याकडे आहे. तसेच स्ट्रीमिंग सेवेच्या माध्यमातून आपल्याला दैनंदिन जीवनातील कथा स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. भारताच्या मनोरंजन उद्योगात सर्व स्तरांतील अविश्वसनीय महिलांच्या कथा आता उदयास येत आहेत. वर्तिका चतुर्वेदी (दिल्ली क्राइम) पासून कस्तुरी डोगरा (आरण्यक) पर्यंत अनेक वास्तविक पात्रांची ओळख करून दिली जात आहे, ती आयुष्यातील चढ-उतारांना धैर्याने सामोरे जातात. त्यांनी निवडलेल्या थीमसह आणि चांगल्या प्रकारे चित्रित केलेल्या पात्रांसह दररोज एक नवीन टप्पा गाठणाऱ्या महिला कथाकारांना पाहूनही प्रेरणा मिळते.

आपल्या सर्वांच्या कथांच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. नातेसंबंध, कुटुंब, मैत्री, करिअर, मातृत्व किंवा आणखी काही. कधी कधी आपण एखाद्या छोट्या शहरावर आधारित ‘पगलैट’सारख्या कथेकडे ओढले जातो. त्याच वेळी अनेकदा असे घडते की ‘द फेम गेम’मधील अनामिका आनंदसारख्या आई, पत्नी आणि मुलीच्या भूमिका निभावण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या आयुष्याविषयी आपल्याला जास्तीत जास्त जाणून घ्यायचे असते. या कथांनी आपल्याला पात्रांच्या जीवनाचा एक भाग बनवले, त्यांना चांगल्या प्रकारे सादर केले आणि त्या बदल्यात आपल्याला त्यांच्याशी जोडले, आपलेपणाची भावना निर्माण केली आणि आपली विचारसरणी विस्तृत केली. आज महिला पडद्यामागील आपल्या खास सिनेमॅटिक शैलीने सर्वांना प्रभावित करत आहेत. त्या वास्तवासह सशक्त कथा मांडत आहेत. हे निर्माते परिभाषित सूत्र आणि शैलींच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांशी उत्तम संबंध निर्माण करणाऱ्या कथा आणतात. अन्विता दत्त दिग्दर्शित ‘बुलबुल’ची मंत्रमुग्ध करणारी कथा, अँथाॅलाॅजीत सर्वात प्रभावी चित्रपटांपैकी एक ‘पावा कढईगल’ दिग्दर्शित करणाऱ्या सुधा कोंगारांपासून मल्याळम सुपरहिट ‘मिनाल मुरली’ची निर्मिती करणाऱ्या सोफिया पॉल आणि ‘हाउस ऑफ सीक्रेट्स : बुराड़ी डेथ्स’ या व्यावहारिक डॉक्युमेंटरी-सिरीजचे दिग्दर्शन करणाऱ्या लीना यादव. ही सर्व चांगल्या महिला कथाकारांची उदाहरणे आहेत.

२०२० मधील ४८.७% वरून आता आमच्या (नेटफ्लिक्स) जागतिक कर्मचाऱ्यांपैकी ५१.७% आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. ‘मसाबा मसाबा’ ते ‘ये काली काली आंखे’ पर्यंत - आम्ही भारतात तयार केलेल्या सर्व कथांपैकी निम्म्याहून अधिक कथांमध्ये स्त्रिया मुख्य पात्र आहेत. दररोज, आम्ही पात्र किंवा कथाकार कोणतीही असो, सार्वत्रिक कथा ओळखणे आणि सांगण्याचे काम आणखी थोडे चांगले करतो. मनोरंजन विश्वातील महिलांच्या भविष्याबाबत आम्ही खरोखरच आशावादी आहोत. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

यंग इंडिया स्तंभासाठी तरुण लेखक मोनिका शेरगिल व्हाइस प्रेसिडेंट-कंटेंट, नेटफ्लिक्स इंडिया editpage@dbcorp.in यावर लेख पाठवू शकतात.

बातम्या आणखी आहेत...