आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तवेध:राजकारण वारशातून मिळते, हा विचार बदलला पाहिजे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला देश कायम निवडणुकांच्या विचारांत गुंतलेला दिसतो. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आम आदमी पार्टी, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष किंवा एखादा राष्ट्रीय-प्रादेशिक पक्ष असो. राज्याची निवडणूक, नगरपालिका किंवा पंचायत समितीची निवडणूक असो. इतकेच काय तर पक्षाच्या राष्ट्रीय किंवा प्रदेशाध्यक्षाची निवडणूक असो. या सर्व निवडणुका होतात कमी, फिक्स जास्त होतात. मात्र, मतदारांना लोकशाहीचा हवाला देत कोणतीही दखल न देता निवडणुका नि:पक्षपणे होत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. आपला देश दररोज निवडणुकीच्या अवस्थेत असतो. सर्व पक्षांचे नेते, सत्ताधारी पक्षांचे मंत्री, खासदार, आमदारांच्या ओठातूनही राजकारण टपकत राहते तेव्हा सामान्य माणसाच्या चिंतेसाठी किंवा देश/राज्याच्या विकासासाठी ते कधी वेळ काढत असावेत, असा विचार आपण सर्व करतो. वस्तुत: सर्वच पक्षांनी राजकारणाला इव्हेंट मॅनेजमेंटचे एक माध्यम बनवले आहे. याची स्क्रिप्ट आधीपासूनच लिहिली जाते. शिल्लक राहते अॅक्शन आणि मग विरोधी पक्षाची रिअॅक्शन.

या अॅक्शन व रिअॅक्शनमध्ये आपल्या देशाचे सव्वाशे कोटी लोक विभागले जातात. जर इव्हेंट मॅनेजमेंटचे राजकारण आहे तर ते राजकारण कुठे गेले, ज्यात तत्त्वे, मूल्ये, प्रामाणिकपणा आणि निष्ठेचा समावेश असायचा? आज निवडणूक लढवणारे उमेदवार आणि निवडून आलेल्या उमेदवाराची व्याख्या करावी लागली तर ते सर्वात कठीण मूल्यांकन आहे. कारण तोच माणूस आधी आणि नंतर इतका बदलतो की, त्याची भाषा, स्वभाव, बोलण्याची पद्धत सर्वकाही हवेत असते. हे वर्तन म्हणजे राजकारणच असू शकते. राजकारणात सध्या घराणेशाही हा शब्द प्रतिध्वनित होत आहे. मात्र, सर्व पक्षांमध्ये सर्व प्रकारच्या वादांसह घराणेशाहीदेखील आहे. हे फक्त ऐकण्यासाठी चांगले वाटते. सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गांधी कुटुंब या निवडणुकीत नाही. कारण घराणेशाहीचे आरोप सहन करता करता कुटुंबातील कोणताच सदस्य ही निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय त्यांना घ्यावा लागला. भलेही निवडणूक लढत नसावेत, पण पक्षावर निवडणूक न लढवता त्यांचा संपूर्ण अधिकार असेल.

राजकारणात घराणेशाही अपवाद नाही, केवळ काही नेत्यांच्या व काही मतदारांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. मतदारांनी या मुद्द्यावर आवाज उठवला तर घराणेशाही व जातीयवादातून राजकारण मुक्त होऊ शकते. राजकारणात निरर्थक वक्तव्यांमुळेही नेत्यांच्या प्रतिष्ठेल तडा गेला आहे. कुठे काय बोलायचे, का बोलायचे किंवा बोलण्याची एखादी मर्यादाही आहे की नाही! या वक्तव्यांत किती तथ्य आहे, खोटेपणा किती, शोध घेत राहा. एखाद्याने खोटारडेपणा उघड केला तर त्याला नेत्याचा विरोधक म्हणून घोषित केले जाते. यामुळेच राजकारणाच्या बाजारात अनेक असत्य सत्याच्या रूपात फिरत आहेत.

ज्यांच्यासाठी नेते हे सर्वकाही करत आहेत त्यांना त्यांचे वाद-विवाद, जातीयवाद किंवा घराणेशाहीशी काही देणे-घेणे नाही. राजकारणाचे स्वरूप बदलण्याच्या दिशेने सर्व पक्षाच्या नेत्यांनी याबाबत विचार केला पाहिजे. मतदाराची नेत्याकडून केवळ एकच अपेक्षा असते. नेत्याने खरे एेकावे, खरे बोलावे आणि जितकी स्वत:ची काळजी घेतात तितकेच त्यांनी मतदारांकडेही लक्ष द्यावे. कुणीतरी असे म्हटले आहे की, राजकारण वारशातून मिळते, पण आता हा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

ओम गौड नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर omgaur@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...