आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक चिमणी दिवस:इवल्याश्या चिमण्यांचे महत्त्व भारी ! ती जगायला हवी..

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चिमणी जगायला हवी' याची जाणीव व्हावी, यासाठी 2010 पासून 20 मार्च हा दिवस 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातोय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचे बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटाने आयुष्याचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचे अस्तित्व देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यातुनच चिमण्यांचे अस्तित्व जपले जावे, म्हणून 'जागतिक चिमणी दिवस' म्हणून साजरा केला जातो. महंमद दिलावर यांनी 2006 मध्ये‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’नावाची एक संस्था स्थापन केली या संस्थेच्या पुढाकारातून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.

चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनूभवता येत नाही. चिमणी ही आपल्या सगळ्यांच्या परिचयाची... कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीच हंगाम वर्षभर असु शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा त्यामुळे नेहेमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतू तिच्यासाठी अंगण नाही, झाडे नाहीत, वळचणी नाहीत आणि घरांमध्ये तिच्या घरट्यासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणपुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ञांच्या अभ्यासीअंती 'चिमणी जगायला हवी'.

जागतिक चिमणी दिन या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील पर्यायाने पर्यावरणाने महत्व समजावणे चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात, परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची गरज कायमस्वरूपी आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.

जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे 'हाऊस स्पॅरो' ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शहरांमध्ये मोबाईल टॉवर्स तसेच आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धत, शहरातील प्रदूषण इत्यादी कारणाने चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ताज्या अहवालानुसार गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या तब्बल 85 टक्क्यांनी घटली आहे.

गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये गाव तसेच शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात मोठ-मोठ्या इमारती आणि घरे बांधण्यासाठी वृक्षतोड करण्यात येत आहे, यामुळे चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला. सोबतच मोबाईलमधून निघणाऱ्या रेडियशनमुळे अनेक चिमण्यांचा जीवास धोका निर्माण झाला आहे. रेडियशनमुळे चिमणीचा केवळ मृत्यूच होत नाही तर त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची प्रजनन संख्यादेखील कमी होते. पक्षांना दररोज अन्न पुरवठा करणे आवश्यक आहे. 'चिमणी जगायला हवी' याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली तर तरच चिमणी जगेल.

बातम्या आणखी आहेत...