आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Inner Strength Can Be Bigger Than You Think, Start The Day With A Small Step ... | Article About Book Review

खुली खिडकी:आपल्या कल्पनेपेक्षाही मोठी असू शकते आंतरिक शक्ती, दिवसाची सुरुवात एका छोट्या पावलाने...

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी जागे झाल्यावर सर्वात आधी आपला बिछाना व्यवस्थित करावा.हे छोटे काम आहे, पण परिणाम मोठा आहे. आपण एक काम करतो तेव्हा पुढच्यासाठी तयार होतो. आपण ते टाळल्यास अनिश्चिततेत राहू. एक छोटे पाऊलही समाधान देऊ शकते आणि संपूर्ण दिवसाची लय तयार करू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात काही विशेष करू शकलो नाही, तरी दिवसाच्या शेवटी किमान आपण प्रयत्न केले, याचे समाधान असेल. यामुळे आपल्याला ऊर्जा मिळेल.

आपली टीम शोधा व तिला तयार करा...
जीवनात यश हे सांघिक कार्यातून येते, त्यामुळे आपली टीम शोधणे आणि त्यातील सर्व सदस्यांना योग्य भूमिका सोपवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. टीम म्हणजे केवळ व्यावसायिक टीम नव्हे, तर त्यात आपले कुटुंब, मित्र, सहकारी यांचा समावेश होतो. सर्व कामे आपल्या हातात ठेवू नका, इतरांवर काम सोपवताना त्यांना पुढे जाण्याची संधी द्या.

आपला दृष्टिकोन समाधान-केंद्रित ठेवा...
जीवनातील आव्हाने टाळणे शक्य नसते. आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपण त्याकडे संधी म्हणून पाहतो. उपायाच्या दिशेने जाणारा दृष्टिकोन असणे चांगले आहे. उदा. खर्च कमी करायचा असेल तर आधी खर्चाचा आढावा घ्या.

कठीण काळात खंबीर राहा...
प्रत्येक जण कठीण काळात आपले सर्वोत्तम गुण दाखवू शकत नाही. खरे तर त्यासाठी ही सर्वोत्तम संधी असते. आपले सामर्थ्य व क्षमतांवर लक्ष केंद्रित करा आणि आपली आंतरिक शक्ती आपल्या कल्पनेपेक्षा अधिक मोठी आहे, हे लक्षात ठेवा.

पुस्तक : मेक युवर बेड
लेखक : विल्यम एच. मॅकरेव्हन, निवृत्त अमेरिकन नौसेना अधिकारी, लेखक, प्रेरक वक्ते आणि व्यवस्थापन गुरू.

बातम्या आणखी आहेत...