आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Lifting Of Sanctions In China Will Have Mixed Effects On The World; Crude Oil Prices And Inflation May Increase

अर्थव्यवस्था:चीनमधील निर्बंध उठवल्याचा जगावर होईल संमिश्र परिणाम; कच्च्या तेलाचे दर व महागाई वाढू शकते

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षांत बहुतांश वेळा (एकूण १०१६ दिवस) चीनचे दरवाजे जगासाठी बंद राहिले. ८ जानेवारीला चीनने आपल्या सीमा उघडल्याचा व्यवसाय, बौद्धिक आणि सांस्कृतिक संपर्कांवर मोठा परिणाम होईल. त्याचा अधिक चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनमधील परिस्थिती सुधारली तर कच्च्या तेलाचे दर वाढतील. महागाई वाढण्याची शक्यता आहे. युरोपला गॅस पुरवण्यात अडचण येणार आहे. चीनची अर्थव्यवस्था वर्षाच्या पहिल्या तिमाहीत संकुचित होऊ शकते. परंतु, अखेरीस आर्थिक उलाढाली वाढतील. त्याचे परिणाम थायलंडचे समुद्रकिनारे, अॅपल, टेस्लासारख्या कंपन्या आणि जगातील मध्यवर्ती बँकांवर जाणवतील.

चीनचे पुन्हा खुले होणे ही २०२३ मधील सर्वात मोठी आर्थिक घटना असेल. काही अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत जीडीपी २०२३ च्या पहिल्या तिमाहीपेक्षा दहा टक्के जास्त असेल. चीनमधील निर्बंध हटवणे ही चीनच्या खर्चावर अवलंबून असलेल्या देशांसाठी चांगली बातमी आहे. फुकेतमधील हॉटेल्स आणि हाँगकाँगमधील मोठ्या शॉपिंग मॉल्सला चिनी लोक घरीच राहिल्याने नुकसान झाले. आता ट्रॅव्हल वेबसाइट्सवर संभाव्य प्रवाशांची गर्दी आहे. २७ डिसेंबरला ट्रिप डाॅट काॅमवरील बुकिंग आदल्या दिवसाच्या तुलनेत २५०% वाढले होते. हाँगकाँगचा जीडीपी ८% वाढू शकतो. निर्यातदार देशांना फायदा होईल. चीन जगातील २०% तेल, शुद्ध पितळ, निकेल, जस्त व ७% लोहखनिज खरेदी करतो.

चीनच्या परतीचा काही देशांवर वाईट परिणाम होईल. जगाच्या काही भागांत विकास दर वाढेल, पण महागाईही वाढेल. केंद्रीय बँकांनी आधीच वेगाने व्याजदर वाढवले ​​आहेत. आता चीनमुळे दरांवर दबाव आला तर जगातील मध्यवर्ती बँकांना कठोर पावले उचलावी लागतील. पाश्चात्त्य देशांसह वस्तू आयात करणाऱ्या देशांमध्ये हे घडण्याचा धोका आहे. तेल बाजाराचा विचार करा. चीनमधील वाढती मागणी युरोप आणि अमेरिकेतील मंद वाढीमुळे कमी मागणीची भरपाई करेल. गोल्डमन साॅक्स बँकेच्या म्हणण्यानुसार, चीनमधील परिस्थिती झपाट्याने सुधारल्यास ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल १०० डॉलर असू शकते. हे सध्याच्या दरापेक्षा २५% जास्त आहे. तेलाचे वाढते दर हा महागाई रोखण्यात अडथळा ठरत आहे. चीन पुन्हा खुला झाल्याने युरोपसाठी गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. झीरो कोविडमुळे चीनमध्ये गॅसची मागणी कमी राहिली. कमी दरामुळे २०२२ मध्ये युरोपसाठी गॅस साठवणे स्वस्त होईल. चीनच्या नेत्रदीपक रिकव्हरीमुळे गॅसच्या आयातीतील स्पर्धा वाढेल. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने इशारा दिला आहे की, २०२३ च्या हिवाळ्यात रशिया युरोपला गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवू शकतो. यामुळे युरोपमधील गॅस ७% पर्यंत कमी होईल.

चीनसाठीही महामारीनंतरच्या सामान्य स्थितीचा अर्थ पूर्वस्थितीची पुनर्स्थापना होणार नाही. सरकारच्या झीरो कोविड धोरणाची कठोर अंमलबजावणी आणि अप्रस्तुत पैसे काढल्यामुळे अनेक गुंतवणूकदार आणि कंपन्यांना आता चीन धोकादायक वाटत आहे. काही कंपन्यांना इतर देशांत जास्त गुंतवणुकीत उत्पादन करायचे आहे. नवीन कारखान्यांमधील गुंतवणूक मंदावली आहे. अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय आवरला आहे. महामारीच्या वर्षांमध्ये चिनी सरकारने दडपशाही आणि राष्ट्रीय भावना भडकावल्याचा परिणाम भविष्यावर होईल.

दररोज ३ कोटी ७० लाख लोकांना संसर्ग चीनमधील परिस्थिती भयावह आहे. विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. झीरो कोविड निर्बंधात औषधांचा साठा, वृद्धांचे अति-लसीकरण आणि रुग्णांवर उपचार यांसारख्या बाबतीत सरकार योग्य तयारी करू शकले नाही. इकॉनॉमिस्टचे मॉडेल सुचवते की, विषाणू अनियंत्रित राहिला तर येत्या काही महिन्यांत चीनमध्ये १५ लाख लोक मरतील. सोशल मीडियावर लोक संसर्गाला सुनामी म्हणत आहेत. शांघाय पब्लिक हेल्थ क्लिनिकल सेंटरमधील डॉक्टरांना वाटते की, शांघायमधील ७०% लोकांना संसर्ग झाला आहे. सरकारी माध्यमांनी एका तज्ज्ञाच्या हवाल्याने म्हटले आहे की, बीजिंगमधील ८०% लोकांना संसर्ग झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...