आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानात विरोधकांना इम्रान खान यांना बाद करायचे होते. इम्रान यांनी वचनाप्रमाणे लढाऊ खेळी करण्याचा प्रयत्न केला. नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासीम सुरी यांनी पंचाची भूमिका स्वीकारली आहे. रविवारी त्यांनी इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला. देशाला दिलेल्या एका संक्षिप्त संदेशात इम्रान म्हणाले की, तीन महिन्यांत नव्या निवडणुका होतील. त्यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना पाकिस्तानची नॅशनल असेम्ब्ली विसर्जित करण्यासाठी राजी केले. त्यांनी माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांना काळजीवाहू पंतप्रधान करण्याची सूचना केली.
शनिवारीच म्हणाले होते की, काळजी करण्याची गरज नाही, माझ्याकडे उद्याची योजना आहे. त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. संसद अधिवेशनात ते उपस्थित राहिले नाहीत. कनिष्ठ सभागृहात विरोधी पक्षांनी सभापती असद कैसर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, त्यानंतर या महत्त्वाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष उपसभापती सुरी होते. इम्रानविरोधातील अविश्वास प्रस्ताव हे आंतरराष्ट्रीय षड््यंत्र असल्याच्या इम्रान यांच्या शब्दांचा सुरी यांनी पुनरुच्चार केला. त्याने प्रस्ताव फेटाळला. ते म्हणाले की, कोणत्याही परकीय शक्तीला पाकिस्तानचे निवडून आलेले सरकार हटवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. दुसरीकडे, पीपीपी या विरोधी पक्षाचे नेते बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले की, आम्ही एकत्र आहोत. पाकिस्तानातील विरोधी पक्षांचे नेते म्हणजे पीएमएल-एनचे शाहबाज शरीफ आणि पीपीपीचे भुट्टो, या दोन्ही घराणेशाही पक्षांनी अनेक दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणावर वर्चस्व ठेवले आहे. इम्रान यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडून तेहरीक-ए-इन्साफचे आघाडी सरकार स्थापन केले होते.
आता आम्हाला कळले की, इम्रान ज्या परकीय शक्तीचा आरोप करत होते ते डोनाल्ड लू हे अमेरिकेचे दक्षिण आशियातील सहायक परराष्ट्र मंत्री आहेत. लू आणि वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानचे राजदूत असद मजीद यांच्यात झालेल्या संभाषणात, एका अमेरिकन अधिकाऱ्याने एका पाकिस्तानी मुत्सद्द्याला सांगितले की, इम्रान अविश्वास प्रस्तावातून सुटले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. अमेरिकेने हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या धोरणांवर टीका केल्याने अमेरिका त्यांना हटवण्याचा कट रचत असल्याचे इम्रान यांचे म्हणणे आहे. इम्रान हे अमेरिकेच्या वॉर ऑन टेररचे कट्टर टीकाकार आहेत, परंतु व्लादिमीर पुतीन यांना भेटण्यासाठी त्यांनी नुकत्याच केलेल्या मॉस्को भेटीमुळे अमेरिका खूपच अस्वस्थ झाली आहे. ज्या दिवशी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले त्याच दिवशी इम्रान पुतीन यांना भेटले. चीन-पाकिस्तान संबंध दृढ करताना इम्रान रशियाकडे हात पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते.
गेल्या आठवड्यात इम्रान यांच्या पक्षाने ३४२ सदस्यीय असेम्ब्लीत बहुमत गमावले. आपले सात खासदार विरोधात मतदान करतील, असे त्यांच्या आघाडीतील प्रमुख भागीदाराने सांगितले. त्याच वेळी इम्रान यांच्या पक्षाच्या डझनहून अधिक खासदारांनी त्यांच्याविरोधात जाण्याचे संकेत दिले होते. ननिवडणुकीत इम्रान यांना लष्कराचे लाडके दाखवले गेले, आज लष्कराला इम्रान यांची अमेरिकाविरोधी बडबड आवडत नसल्याचे संकेत आहेत. लष्करप्रमुख कमर बाजवांनी नुकतेच सांगितले की, पाकिस्तानचे अमेरिका व चीनशी चांगले संबंध आहेत. त्याच वेळी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावरही त्यांनी स्पष्ट टीका केली. आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीवरून लष्कर इम्रानवर आधीच नाराज होते, आता इम्रान यांनी अमेरिकेविरुद्ध उघडलेली आघाडी पाकिस्तानने अत्यंत सावधगिरीने बनवलेल्या धोरणाच्या विरोधात आहे, त्याचे पालन अमेरिका व चीन दोघांनीही केले पाहिजे. पाकिस्तानची नाजूक आर्थिक स्थिती ही महत्त्वाची बाब आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
मनोज जोशी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे प्रतिष्ठित फेलो manoj1951@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.