आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The More Progress You Make, The More Important It Is To Return To Your Roots

मॅनेजमेंट फंडा:जितकी प्रगती कराल तितके आपल्या मुळांकडे परतणे अधिक महत्त्वाचे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी नुकताच गोव्याला गेलो होतो, तिथल्या दोन घटनांनी लक्ष वेधून घेतले. तळेगाव नावाच्या गावातील २० हून अधिक मुले शेतात काम करत होती, याकडे माझ्यासारख्या वाटसरूचे लक्ष वेधले गेले नाही. पण ते पिकनिकसारखे असून स्थानिक लोकांनी आयोजित केले होते, जेणेकरून मुलांना शेतातील तण काढून पुन्हा लागवड करता येईल, यामुळे मातीचे पुनरुज्जीवन होईल. याशिवाय मैदानी उपक्रम शिकण्याचाही एक मार्ग आहे. गोव्यातील लोकांची आपले राज्य स्वत:च्या वापरासाठीच्या भाजीपाल्यांमध्ये स्वयंपूर्ण होण्याची इच्छा वाढत आहे आणि त्यांच्या मते मुलांच्या अभ्यासक्रमात शेतीचा समावेश करण्याची हीच योग्य वेळ आहे. शेतातील अशा सहली त्यांच्यासाठी अत्यंत प्रशिक्षणात्मक असतात, कारण ती पुस्तकांमध्ये वाचलेले नैसर्गिक सौंदर्य प्रत्यक्ष पाहतात. ती केवळ वनस्पतिशास्त्र आणि फलोत्पादनाचे विविध पैलू शिकत नाहीत, तर पिकांच्या वाढीसाठी योग्य हवामान आणि त्यांची लागवड कशी करावी हेदेखील शिकतात. आणि दुसऱ्या घटनाक्रमात संपूर्ण सप्टेंबर महिन्यात सात स्टार्टअप्स सिंगल युज प्लास्टिक (एसयूपी) च्या जागी जैवविघटनशील साधनांचा प्रयत्न करतील, उदा. नारळाच्या शेंड्या, उसाचे गाळप (लगद्यासारख्या फायबरने समृद्ध), सेल्युलोजसमृद्ध भाताचा पेंढा, केळीची साले आणि बांबू इ कृषी कचरा. गोव्यातील स्टार्टअपसह हे स्टार्टअप्स एसयूपी चॅलेंजच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत, त्याला जर्मनीच्या केंद्रीय आर्थिक सहकार्य-विकास मंत्रालयाकडून निधी दिला गेला. गोव्यातील व्यवस्थापन संस्थेच्या अटल इनक्युबेशन सेंटरमध्ये यावर काम केले जात आहे, ते उत्पादन प्रक्रियेसाठी तसेच पूर्णवेळ मार्गदर्शनासाठी निधी प्रदान करेल. ‘कागजी’ स्टार्टअप स्ट्राॅसाठी प्लास्टिकऐवजी गव्हाच्या पेंढ्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जेवणाच्या टेबलावर वापरल्या जाणाऱ्या गोष्टी नारळाच्या शेंड्यांपासून बनवण्याचा प्रयत्न ‘कासोई’ करत आहे.

यावरून मला गुजरातमधील जुनागढच्या पुरुषोत्तम सिद्धपारा यांची आठवण झाली, त्यांनी सेंद्रिय शेतीद्वारे खर्च ४०% आणि पाण्याचा वापर २०% कमी केला. त्यांना निर्यातीसाठी १० देशांमधून ऑर्डर मिळतात! हे ५१ वर्षीय शेतकरी संभाव्य डीलर्स-ग्राहकांना त्यांच्या शेतात बोलावतात, तिथे ते त्यांच्यासोबत राहू शकतात. ते एक रु.ही न घेता त्यांना त्यांच्या शेतीची पद्धत सविस्तरपणे दाखवतात, तेथील पिकापासून तयार केलेले पदार्थ त्यांना खायला देतात व सर्व प्रश्नांची उत्तरे देतात. पदार्थ आवडले तर ते औपचारिकता पूर्ण करतात. ते व्हॉट्सअॅपवर कापणीचे अपडेट्सही पाठवतात. पिके विकण्याच्या या अनोख्या कल्पनेने विश्वासही निर्माण केला आहे. १९९९ पर्यंत येथे दुष्काळ हे एक मोठे आव्हान होते. एक वर्ष तीन हजार लोकसंख्येच्या या गावातील लोकांनी एकत्र येऊन पावसाचे पाणी साठवण्यासाठी ५५ छोटे बंधारे आणि तलाव बांधण्यासाठी पैसे उभे केले.

- फंडा असा ः आपण जितके भविष्याकडे वाटचाल करत आहोत, तितकेच आपल्याला आपल्या मुळांकडे परतावे लागेल आणि शेती हे त्यातील महत्त्वाचे मूळ आहे.

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

बातम्या आणखी आहेत...