आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्रजांनी १८५७ नंतर आपल्या शासन व्यवस्थेत बदल करून भारतावरील पकड आणखी मजबूत केली होती. १९१९ मध्ये ब्रिटनमध्ये उन्हाळ्याचे दिवस होते. तेव्हा हाऊस ऑफ कॉमन्सची बैठक घेण्यात आली होती. सर आर्ची ब्रिकमायरे भाषण करत होते. जवळपास दोन तास भारतातील इंग्रज सत्तेवर चर्चा झाली. पंजाबमध्ये इंग्रज सरकारला होणाऱ्या तीव्र विरोधाविषयी ब्रिकमायरे म्हणाले, पंजाबचे राज्यपाल मायकल ओ ड्वायर राज्यात चांगले काम करत आहेत. सर ग्रॅहम रिचर्ड हाऊस ऑफ कॉमन्सच्या परिसरात लेडी बेलेट्स यांच्याशी झालेल्या चर्चेत म्हणाले, भारतात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कितीही आंदोलने झाली तरी इंग्रज देश सोडणार नाहीत.
उलट इंग्रज भारतात कायम राज्य करू इच्छितात. मग भलेही पहिल्या महायुद्धाचा परिणाम काहीही असो. इंग्रजांचे हे मनसुबे चकीत करणारे होते. आम्ही भारतात इंग्रजांसोबत बैठका करत होतो. विरोधात आंदोलन सुरू केले होते. हे ऐकल्यानंतर मनात एक गोष्ट आली. आता स्वराज्य मिळालेच पाहिजे. १९०५ नंतर क्रांतिकारांचे खटले लढवले. या कार्यकर्त्यांमध्ये एवढा जोश कुठून येत असावा, असा विचार मी करत असे. त्यांचे खटले मोफत लढवण्याचा निर्णय घेतला. गांधीजींनी १९२० मध्ये असहकार आंदोलन सुरू केले. तेव्हा या आंदोलनाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम देखील त्यात सक्रिय होत होते. परंतु गांधीजींनी अचानक असहकार आंदोलन मागे घेतले. ही कृती कदापि योग्य नव्हती. इंग्रजांचे मनसुबे पाहता आपण इंग्रज सत्तेवर वार करणे गरजेचे होते. संपूर्ण स्वराज्यातूनच भारत भारतीयांचा होऊ शकतो. हे माझ्या लक्षात आले होते. इंग्रज सत्तेमधील सुधारणा सुचवणे अप्रामाणिकपणा दर्शवण्यासारखे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.