आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहिदा परवीन १९९५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून भरती झाल्या होत्या. १९९७ मध्ये त्या पहिल्या महिला कमांडो झाल्या. १९९७ ते २००२ दरम्यान त्यांनी राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात हिजबुल आणि लष्करच्या अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला.
वाचा या महिला एन्काउंटर स्पेशालिस्टची कहाणी त्यांच्याच तोंडून ...
जे व्हा मी सुमारे चार वर्षांची होते, तेव्हा वडील गेले होते. मी सहा भावाबहिणींच्या कुटुंबात सर्वात लहान होते. परंतु आईने शिक्षण सुटू दिले नाही. भावांसोबत मलाही शिकवले. नंतर मी जम्मूतील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कामाला सुरुवात केली. दरम्यान, एका सरकारी शाळेतील नोकरीसाठी मुलाखत दिली. ही नोकरी मला मिळावी, यासाठी प्रार्थना करत होते. मग कुटुंबातील कोणालाही न सांगता पोलिस भरतीचा फाॅर्म भरला. पोलिसात भरती झाल्यानंतर जीवन आणि मृत्यूचा नवा साक्षात्कार झाला. एका अतिरेकी हल्ल्यानंतर मी सहकाऱ्यासोबत घटनास्थळी पोहोचले होते. लहान मुले व महिलांची हत्या केली होती. त्या दिवशी मी घरी गेल्यावर आईला म्हणाले होते, त्यांनी निरपराध्यांचे प्राण घेतले, त्यांना ईश्वराबाबत माहिती नाही. आई म्हणाली होती, तू देशावर, वर्दीवर प्रेम करत असशील तर अशा लोकांना धडा शिकवताना तुझे हात थरथरू नयेत. आणि असेच झाले. आयुष्यातील पहिल्या मोहिमेच्या वेळी मला सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली की मोठ्या संख्येने अतिरेकी एका गावात आले आहेत. मी ऑपरेशन हाती घेतले. टीमसोबत त्या गावाची नाकेबंदी केली. शेकडो राउंड गोळ्या दोन्ही बाजूंनी झाडल्या गेल्या. परंतु ते पळून गेले. मला वाटले वरिष्ठ आता काय विचार करतील. पहिल्याच ऑपरेशनमध्ये अपयश आले होते. परंतु वरिष्ठ म्हणाले, तुझी माहिती बरोबर होती. म्हणजे तुझे नेटवर्क योग्य तऱ्हेने काम करतेय. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. याच दरम्यान, जुलै २००१ मध्ये एका गावातील मुलीने एका घरात काही अतिरेकी लपल्याची माहिती दिली होती. आम्ही तयारीनिशी घटनास्थळी गेलो. परंतु अतिरेकी पळाले. घराची झडती घेतली, पण काहीच मिळाले नाही. घरातील लोक घाबरलेले होते. काही तरी लपवत होते. मला शंका आली की अतिरेकी जवळच आहेत. ते शेतात गेले असावेत म्हणून तिकडे गेलो. तेव्हा अचानक एका अतिरेक्याने गोळीबार सुरू केला. मी त्याचा खात्मा केला. वर्षभराने एकानंतर एक यशस्वी मोहिमा पार पाडल्या. मला आऊट ऑफ टर्न प्रमोशन देऊन निरीक्षक बनवले . राष्ट्रपती पदक दिले गेले. दहशतवादाविरुद्धचा संघर्ष सुरूच राहणार. {शब्दांकन : मोहित कंधारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.