आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनमार्ग:योगाचा पर्यायच शांतता आहे

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस असण्याची किंमत मोजा. ते भोगाने नव्हे, तर योगाने होईल. प्रश्न पडतो की, मानवी जीवनाचा सर्वात मोठा उद्देश काय आहे, तर त्याचे उत्तर असावे आत्म्याची जवळीक. त्यानंतर सर्व भौतिक प्रवास सुरू झाला पाहिजे. खूप काम करा, भरपूर पैसा कमावा, पण हे लक्षात ठेवा की, आपण यशाच्या प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याला जे मिळते ते त्याच्या ठिकाणी, पण पणाला लागतात पाच गोष्टी - वेळ, नाती, संपत्ती, संतती आणि आरोग्य. परंतु, जे योगाभ्यास करतील त्यांची तब्येत ठीक राहील आणि तब्येत चांगली असेल, तर बाकीच्या गोष्टी आपोआप सुरळीत होत जातील. योगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा शाaरीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. आयुष्यात दोन्हींचा समतोल असायला हवा. आज अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. येत्या १०-१५ वर्षांत शोधूनही शांतता मिळणार नाही, तेव्हा ती योगाद्वारेच मिळेल. म्हणून आज योगदिनानिमित्त योगासने जीवनात संकल्प करून आणा, कारण जगात राहून जे काही करायचे आहे ते पूर्ण शांततेने केले पाहिजे. योगाचा पर्यायच शांतता आहे. Facebook:Pt. Vijayshankar Mehta

बातम्या आणखी आहेत...