आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाई वाढल्याने देशातील कारखान्यांचा वेग काहीसा मंदावला आहे. एस अँड पी ग्लाेबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजर्स निर्देशांक (पीएमआय) मार्चमध्ये कमी हाेऊन ५४ वर आला. हा गेल्या सहा महिन्यांतील सर्वात नीचांकी स्तर आहे. फेब्रुवारीत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५४.९ हाेता. गेल्या महिन्यात उत्पादन क्षेत्रात कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही ही एक चांगली गाेष्ट झाली आहे.
एस अँड पी ग्लाेबलच्या नुसार गेल्या महिन्यात महगाई पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर हाेती. हा चिंतेचा विषय आहे. जर महागाईत आणखी वाढ झाली तर मागणी कमी हाेऊ शकते. त्याचा उत्पादन क्षेत्रावर परिणाम हाेऊ शकताे. परंतु तरीही मार्च महिन्यात पीएमआयचे आकडे ५०च्या वर हाेेता. याचा अर्थ उत्पादन क्षेत्रात वाढ झालेली असली तरी फेब्रुवारीत ती कमी हाेती. पीएमआय ५० च्या वर असणे म्हणजे वृद्धी असा संकेत आहे.एस अँड पी ग्लाेबलच्या म्हणण्यानुसार मार्चमध्ये नवीन आॅर्डरमध्ये वाढ हाेण्याचे प्रमाण ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले. यासह, सलग ८ महिने परदेशातून आलेल्या ऑर्डर्सच्या वाढीला ब्रेक लागला आहे.
उत्पादन खर्चात झालेली वाढ हे मुख्य कारण
एस अँड पी ग्लोबलच्या अर्थशास्त्राच्या सहयोगी संचालक पोलियाना डी लिमा यांनी सांगितले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस भारतीय उत्पादन क्षेत्राची वाढ कमकुवत झाली आहे. पुन्हा उत्पादन खर्चात वाढ हाेणे हे याचे प्रमुख कारण होते. रसायने, ऊर्जा, कपडे, खाद्यपदार्थ आणि धातूंच्या किमती फेब्रुवारीच्या तुलनेत जास्त होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.