आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Practice Of False Prosecutions And Baseless Accusations Is Not New | Article By Hariwansh

चर्चा:खोटे खटले आणि तथ्यहीन आरोपांची प्रथा नवीन नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायाचे तत्त्व आहे गुन्हेगार सुटला तरी चालेल निरपराध्याला शिक्षा नको. मात्र खोटे खटले, तथ्यहीन आरोप, मीडिया ट्रायल, लोकनिंदा, आत्मवेदना शिक्षेपेक्षाही भयंकर आहे. दुसऱ्या महायुद्धातील पाच घटना पुन्हा चर्चेत आहेत. अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमरवर अमेरिकेत सोव्हिएत हेर असल्याचा आरोप (१९५४) झाला होता. सर्व गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक झाल्याच्या अनेक वर्षांनी ते आता निर्दोष सिद्ध झाले आहेत. ओपेनहायमर यांनी पहिली अणुचाचणी (१९४५) पाहिली तेव्हा गीताच्या ओळीत पहिली प्रतिक्रिया दिली, ‘आता मी मृत्यू (संहार) आहे, जगाचा विनाशक!’ राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्या कार्यकाळात गुप्त शस्त्र प्रयोगशाळेचे प्रमुख होते. त्यांच्याच बॉम्बने निर्णायक विजय मिळवून दिला. अमेरिकेच्या अणू आयोगाचे अध्यक्ष झाले. मात्र मोठ्या यशाची मोठी किंमत असते. मत्सर, द्वेष, षड्यंत्रासारखी अदृश्य तत्त्वे फक्त व्यक्तीचेच आयुष्य प्रभावित करत नाहीत तर देशाच्या भवितव्यावरही परिणाम करतात. ओपेनहायमर याला बळी पडले. १९६७ मध्ये कॅन्सरने ते गेले. त्यांचे चरित्र लेखक कायिव्ह वर्ड यांनी सांगितले, १९५४ मध्ये जे झाले, ते न्यायाच्या नावावर व्यंग होते. अशा घटना प्रत्येक देशात घडतात. भारतातील वरिष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ नंबी नारायण यांचे प्रकरण घ्या. पाकिस्तानला गुप्त माहिती विकल्याचा आरोप केरळ पोलिसांनी (१९९४) केला. १९९६ मध्ये स्थानिक न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले. प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात गेले. दोन दशकांनंतर सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले, हा खटला खोटा आहे. तेव्हा प्रा. नारायण यांनी सांगितले, आयुष्य ओझे झाले होते, मात्र खोट्या कलंकाने न जगण्याच्या भावनेने, दोन दशके न्यायासाठी भटकलो. आयुष्यातील सर्वाेच्च काळ, ऊर्जा, संकल्प मातीमोल ठरले. इस्रोच्या शास्त्रज्ञांवर मोठा परिणाम झाला. अंतराळात अवजड रॉकेट सोडण्याच्या योजनेला मोठा धक्का बसला. संकेत असे आहेत की हादेखील आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग होता.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला डाेंगराच्या शिखरावरून आम्ही कॅनबरा शहराचे सुंदर दृश्य बघत होतो. सुंदर आर्किटेक्चर, प्लॅनिंग, सर्वोत्तम लँडस्केप व डिझाइन. या सुंदर राजधानीचे आर्किटेक्ट होते, अमेरिकेचे वॉल्टर ग्रिफिन. त्यांची पत्नी मारिओन ग्रिफिन २० व्या शतकातील तीन प्रभावशाली शिल्पकारांपैकी एक होती. १९०८ मध्ये जगातील सर्वात सुंदर राजधानी बनवायची इच्छा ऑस्ट्रेलियाची झाली. जगातील मोठ्या आर्किटेक्ट्सना बोलावले. १३० वास्तुतज्ज्ञांमधून ग्रिफिन निवडले गेले. या सुंदर राजधानीची पायाभरणी त्यांनी केली. काम पुढे गेले. मग अंतर्गत स्पर्धा आली. चौकशीसाठी ‘राॅयल कमिशन’ आले. ग्रिफिन दांपत्य मेलबर्न- सिडनीत मोठी कामे करू लागले. त्याच काळात भारताचा संयुक्त प्रदेशातील (आजचे उत्तर प्रदेश) लखनऊ विद्यापीठाचा प्रकल्पही त्यांना मिळाला. १९३६ मध्ये कृषी प्रदर्शनाची जबाबदारी मिळाली. लखनऊची पायनिअर प्रेस बिल्डिंगही ग्रिफिन दांपत्याची देणगी आहे. सहा दशकात जगातील तीन उपखंडांत या दांपत्याने वास्तुकलेच्या स्मरणीय इमारती बनवल्या. तिकडे चौकशी आयोगाच्या स्थापनेच्या काही वर्षांतच ऑस्ट्रेलिया सरकारने गॅझेट प्रकाशित करून उल्लेख केला की, ग्रिफिन यांच्या कॅनबेरा प्लॅनमध्ये बदल संसदेच्या परवानगीशिवाय शक्य नाही. हा ग्रिफिनच्या कामावर ऑस्ट्रेलिया सरकारचा प्रामाणिकपणाचा शिक्का मानला गेला. मात्र चौकशीचा त्यांना धक्का बसला. अशा निर्दोष लोकांच्या वेदनेचे उत्तर न्याययंत्रणा किंवा व्यवस्थेकडेही नाही. महाभारतातील प्रसंग याबाबत दिलासा ठरू शकेल. कृष्णाच्या सांगण्यावरून द्वारकेतील स्त्रियांना घेऊन अर्जुन हस्तिनापूरला परतत आहेत. मध्येच आदिवासींसोबत युद्ध होते. आदिवासी सर्व हिसकावून घेऊन जातात. अर्जुन महर्षी व्यासांकडे जातात. सर्व घटना सांगतात. व्यास, अर्जुनाला सांगतात, व्यक्ती कर्ता नसते. वेळ वा काळाचा हा प्रताप आहे. व्यक्ती नव्हे, परिस्थिती निर्णायक असते. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

हरिवंश राज्यसभेचे उपसभापती rsharivansh@gmail.com

बातम्या आणखी आहेत...