आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘ज्या दिवशी आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही, त्या दिवशी आपण आज चुकीच्या मार्गावर चाललो आहोत की नाही हे नीट तपासून पाहा’, असे स्वामी विवेकानंद सांगत असत. समस्या हे दुर्दैव नाही, तर जीवनाचा एक भाग आहे. संघर्षशील माणसे त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध करतात. ज्यांना संघर्षाशिवाय मिळते ते उथळ राहतात. त्यामुळे जीवनात काही गोष्टी संघर्षाने करा आणि काही गोष्टी घडताना पाहा. शिक्षण आणि पैसा या क्षेत्रांत खूप संघर्ष आहे. आता येणाऱ्या काळात शिक्षणाशिवाय योग्य मार्गाने पैसे कमावणे फार कठीण होणार आहे.
भगवान श्रीकृष्णाने उज्जैनच्या सांदीपनी आश्रमात शिक्षण पूर्ण केले तेव्हा कुबेरांनी गुरुदीक्षेसाठी ताट भरून धन आणले होते, पण गुरुमाता म्हणाल्या, मला माझी मुले हवी. गुरुमातेच्या सांगण्यावरून कृष्ण त्यांच्या मुलांना आणायला गेला तेव्हा कुबेर तिथेच थांबला. शिक्षण व संपत्ती, विद्या व वैभव यांचा संबंध आहे, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. फक्त त्यांना योग्यरीत्या जोडता आले पाहिजे. खूप संघर्ष करून शिक्षण व पैसा कमवा, पण आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी पाहा आणि त्या होऊ द्या. उदा. दिवस मावळणे, रात्र होणे यात आपण काहीही करू शकत नाही, फक्त ते पाहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अनेक घटना घडताना पाहिल्या तर कदाचित संघर्षानंतरही अस्वस्थता येणार नाही. Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.