आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Real Meaning Of Therapy Is To Invest In Yourself| Article By Samahita Arni

यंग इंडिया:थेरपीचा खरा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करणे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही काळापूर्वी महामारीमुळे आपल्याला एकांतात राहावे लागत होते. यामुळे आपल्यामध्ये चिंता आणि अनिश्चिततेची भावना अधिकच वाढली. समाजात मानसिक आरोग्याविषयी बोलण्यास संकोच केला जातो. मी स्वत: गेल्या काही वर्षांपासून थेरपी घेत आहे आणि मी इतरांना याबद्दल सांगितले तेव्हा काहींनी माझे ‘धैर्यवान’ असल्याबद्दल अभिनंदन केले, तर काहींनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, जणू ते म्हणत असावेत - मी यशस्वी, सशक्त आणि स्वतंत्र स्त्री आहे. मग उपचाराची गरज काय गरज? ते स्वीकारणे म्हणजे आपली कमजोरी मान्य करण्यासारखे आहे, असे त्यांना वाटते. मानसिक आरोग्याशी संघर्ष करतात ते ‘शक्तिशाली’ नसतात, असे मानले जाते. ही धारणा आपल्या मनात रुजली आहे की जे मजबूत आहेत ते विटांच्या भिंतीसारखे कठोर असतील. विटांची भिंतही हातोड्याच्या फटक्याने पाडता येते, हे ते विसरतात. पाणी हेदेखील शक्तीचे एक रूप आहे. लाओत्से यांनी ताओ तेह किंगमध्ये म्हटले की, आपण पाण्यासारखे मऊ आणि लवचिक असले पाहिजे, परंतु पर्वत कापणे आणि खडक हलवण्याइतके मजबूतही असायला हवे.

मी वैयक्तिक अनुभवातून सांगते की, थेरपीनंतर आपण आपले जीवन नदीसारखे नवीन मार्गांवर वाहताना पाहू शकतो, परंतु त्याच वेळी ते आपल्याला आपला मार्ग आणि आपला प्रवाह निवडण्याची क्षमतादेखील देते. हे विशेषतः महत्त्वाचे बनते जेव्हा सवयी आणि विश्वास विकसित करण्यासाठी आपले पालनपोषण केले ​​गेले, ज्याने आपल्या जीवनात एखाद्या वेळी आपल्याला मदत केलीही असेल, परंतु आता जिथे आपली क्षमता कमवायची आहे अशा जागेत जाण्यासाठी आपल्याला त्यांचा पुनर्विचार करावा लागेल आणि स्वतःला बदलावे लागेल. मला माझे उदाहरण तुम्हाला सांगायचे आहे. मी वियोग, एकटेपणा आणि एकाकीपणाशी संघर्ष केला. मी माझ्याच कामात गुदमरतेय, असे वाटले. मी माझ्या थेरपिस्टसोबत काम केले तेव्हा मला समजू लागले की, स्पर्धात्मक असण्याची माझी प्रवृत्ती एकाकीपणाची भावना निर्माण करत आहे. त्यामुळे माझा इतरांशी असलेला संबंधही तुटू लागला. मला जिंकायचे होते, मला टॉपर व्हायचे होते आणि यशाची माझी एक कल्पना होती. यश म्हणजे इतरांपेक्षा चांगले असणे, असे मला वाटत होते.

त्याची मुळे शोधून काढताना माझ्या लक्षात आले की, लहानपणी चांगले रिपोर्ट कार्ड मिळाल्यावर माझ्या आई-वडिलांना खूप आनंद झाला होता, तर वाईट रिपोर्ट कार्डमुळे त्यांना राग आला होता. यामुळे माझ्यात अशी प्रवृत्ती निर्माण झाली की मी जरी मोठी होत असले तरी मी नेहमी शीर्षस्थानी राहण्याचा प्रयत्न केला आणि यामुळे माझे संतुलन बिघडले. इतरांसोबत जवळून काम करणे आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणे माझ्यासाठी कठीण होत गेले. मी माझ्या सहकाऱ्यांना स्पर्धक म्हणून पाहू लागले आणि गरज असताना त्यांची मदत मागू शकले नाही. पण, स्पर्धात्मक प्रवृत्ती सोडून आणि समन्वय व सहमतीचे मूल्य लक्षात येताच मी माझ्या कामाचा आनंद घेऊ लागले. मनोरंजक गोष्ट म्हणजे स्पर्धेची भावना सोडून दिल्याने मला अधिक यश मिळू लागले - पूर्वीपेक्षा जास्त लोक माझ्यासोबत काम करू लागले, माझ्याकडे अधिक प्रकल्प येऊ लागले.

थेरपी म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करणे. नैराश्यामुळे मी थेरपीकडे गेले, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला याची जाणीव झाली, माझ्या आयुष्याची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली नाही. मी जीवनात अडथळा आणणाऱ्या निरुपयोगी धारणांच्या बेड्या तोडू शकते आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत व नवीन परिस्थितींमध्ये अधिक समावेशक होऊ शकते. मी माझा अनुभव तुम्हाला एक वास्तव म्हणून सांगत आहे. सतत बदलत्या काळात आपल्याला विकसित व्हायचे असेल तर बदलाच्या शक्यतांबाबत आपण स्वतःला खुले ठेवले पाहिजे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)

समाहिता अर्णी न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लेखिका sam@samarni.com

बातम्या आणखी आहेत...