आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संशोधन:कॉफी अन् साखरेचे योग्य प्रमाण मृत्यूची शक्यता 30% कमी करते

दानी ब्लमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॉफी पिल्याने मृत्यूची शक्यता कमी असते, असे एका नव्या संशोधनात आढळले आहे. ज्या लोकांनी एक चमचा साखरेसोबत दीड ते साडेतीन कप कॉफीचे दररोज सेवन केले होते, त्या लोकांचा कॉफी न पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत मृत्यू होण्याचा धोका ३० टक्के कमी राहतो, असा एनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित संशोधनाचा निष्कर्ष आहे. संशोधकांनी ब्रिटनमध्ये लोकांच्या आरोग्याची माहिती मिळवणारा मोठा मेडिकल डेटाबेस- यूके बायोबँककडून कॉफी पिण्याच्या आकड्यांचे विश्लेषण केले आहे. त्यांनी सलग सात वर्षे ३७ ते ७३ वर्षे वयोगटातील एक लाख ७० हजार लोकांची जीवनशैली, आहाराशी संबंधित माहितीचा अभ्यास केला आहे.

संशोधनानुसार कॅफीनयुक्त आणि कॅफीन नसलेली कॉफी पिणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी आढळून आला. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधील मेडिसिनच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. क्रिस्टिना व्ही. सांगतात, मृत्यूचा धोका ३० टक्के कमी करणाऱ्या अशा खूप कमी गोष्टी आहेत. डॉ. क्रिस्टिना यांनी या संशोधनाचे संपादन केले आहे. तथापि, संशोधनात सांगण्यात आले की, एकट्या कॉफीमुळे मृत्यूचा धोका कमी असणे हे पूर्णपणे सिद्ध करता येत नाही. यापूर्वीही अनेक संशोधनात कॉफी पिल्याने आरोग्याला अनेक फायदे असल्याचे संकेत मिळाले.

बातम्या आणखी आहेत...