आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The System Itself Encourages The Corruption Of Compromise | Agraekh Of Divya Marathi

अग्रलेख:व्यवस्थाच तडजोडीच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासकीय सुधारणा आयोग-२ अहवालात भ्रष्टाचाराचे दोन प्रकार नमूद केले आहेत - कोएर्सिव्ह (कायद्याचा धाक दाखवून) आणि कोल्युसिव्ह (संगनमत करून). आयोगाच्या म्हणण्यानुसार, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये दुसऱ्या प्रकारचा भ्रष्टाचार रुजला आहे. हे थांबवण्यासाठी कठोर कायदे केले जावेत, त्यामध्ये निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल आणि तपासासाठी पूर्णपणे स्वायत्त संस्था असावी, असा आयोगाचा सल्ला होता. या प्रकारच्या भ्रष्टाचारात निकृष्ट साहित्य वापरण्यासाठी अभियंता-कंत्राटदार यांच्यात संगनमत होऊन पैशांची विभागणी होते. काही वर्षांनी पैशाच्या जोरावर व्यवस्थेला दडपण्याची जबरदस्त ताकद या दोघांमध्ये येते. पुलाचे कंत्राट कोणाला देण्यात आले होते, ते अशा कामात पारंगत होते का, १४० वर्षांपूर्वीच्या पुलाची दुरुस्ती कशी झाली, प्रमाणपत्राची स्थिती काय होती, क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे का विकली व याच्या देखरेखीची जबाबदारी कोणाची होती, हे काही प्रमुख प्रश्न आहेत. परंतु, आपल्याला माहीत आहे की, देशात अशा डझनभर घटनांत शेकडो लोकांचा मृत्यू झाल्यानंतर केवळ काही छोट्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाते, समित्या/आयोग स्थापन केले जातात, त्यांच्यावर खटले चालवले जातात व शेवटी एकाही व्यक्तीला शिक्षा होत नाही, कारण आपली व्यवस्था कोल्युसिव्ह भ्रष्टाचाराला पोषक आहे. असा भ्रष्टाचार समाजही सवयीने सहन करतो आणि काही दिवसांतच तो विसरतो आणि दुसऱ्या पुलावर डोलू लागतो. भ्रष्टाचारावर नाराज व्यक्ती आपल्या मुलाच्या नोकरीसाठी लाच द्यायला, नेत्याची चिरफाड करायला आणि जाती-पंथाचा फायदा घेण्यास कचरत नाही. समाजाची सामूहिक-व्यक्तिगत जाणीव बदलण्यासाठी नैतिक क्रांतीची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...