आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केट:कटू वास्तवाचा सामना करत आहे तंत्रज्ञानाची बाजारपेठ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, वाढते व्याजदर, महामारी थांबण्याचे नाव घेत नाही, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध : या सर्व घटना टेक स्टॉकच्या घसरणीसाठी एकत्रितपणे जबाबदार आहेत. २०२१ हे तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, उद्यम भांडवलदार आणि क्रिप्टोकरन्सीसाठी उत्तम वर्ष होते, परंतु आता ते तंत्रज्ञान मूल्यमापनाच्या वास्तवाचा सामना करत आहेत. आज अशी अवस्था झाली आहे की, उद्योग तोंडावर पडला आहे. ही २००१ मधील परिस्थिती आहे का, ज्याला वेब क्रॅश १.० म्हटले गेले होते की २००८ मधील परिस्थिती, ज्याला वेब क्रॅश २.० म्हटले गेले होते. किंवा कदाचित हे नवीन वेब क्रॅश ३.० आहे. अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स रसातळाला गेले आहेत. अॅपलचे १५ टक्के नुकसान, अल्फाबेटची १२ टक्के घसरण, एअरबीएनबी जवळपास २८ टक्के घसरले आहे. जे आधीच कमकुवत स्थितीत होते, त्यांचे नुकसान आणखी मोठे आहे. नेटफ्लिक्स शेअर एप्रिलपासून अर्धी किंमत गमावून बसला आहे.

सर्वात मजेदार कथा ट्विटरची आहे. टेक उद्योगातील वादळापासून ट्विटर आतापर्यंत अप्रभावित राहिले आहे, तथापि अनेक वर्षांपासून ते इतर मोठ्या सिलिकॉन व्हॅली कंपन्यांपेक्षा मागे पडले आहे. अर्थात, इलाॅन मस्क यांच्या ४४ अब्ज डाॅलरच्या टेकओव्हर-बिडने त्याला टिकवून ठेवले. परंतु, हे अधिग्रहणदेखील आता डगमगते दिसत आहे, कारण ते टेस्लाच्या भविष्यावर अवलंबून होते. आणि जिथे प्रत्येक जण बुडत आहे, तिथे टेस्लाला कोणते पंख लागलेले आहेत? गेल्या महिन्यात त्याचे शेअर्स ३० टक्क्यांनी घसरले होते. शुक्रवारी इलाॅन मस्क यांनी धमाका केला. ट्विटर डील होल्डवर असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. याचे कारण त्यांनी प्रलंबित तपशिलांना दिले, त्यावरून असे दिसून येते की ट्विटरच्या एकूण वापरकर्त्यांपैकी पाच टक्के स्पॅम किंवा बनावट आहेत. मस्क यांचे ट्विट अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजमध्ये व्यवहार सुरू होण्यापूर्वी आले आणि ट्विटरचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले. मग मस्क यांनी, मी अजूनही ट्विटरच्या अधिग्रहणासाठी वचनबद्ध आहे, असे सांगून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु आत्मविश्वासाच्या अभावाशी झुंजणाऱ्या मार्केटचे नुकसान झाले होते. टेस्लाची स्थिती पाहता १ अब्ज डाॅलर वॉकअवे फी मस्क यांच्यासाठी एक फायद्याचा व्यवहार म्हणता येणार नाही. इलॉन मस्क यांना ट्रोलिंगचा कितीही शौक असला तरी ते एखाद्या डगमगत्या कंपनीकडून तोटा का सहन करतील? वाऱ्याची दिशा जाणून घेण्यासाठी आपण त्या आनंदी उद्यम भांडवलदारांचे सोशल मीडिया हँडल्स तपासले पाहिजेत, जे आजवर वेगळी भाषा बोलत होते, परंतु त्यांनी आता अनेकदा मार्केट करेक्शन व कंपनी राइट-साइझिंग असे शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. असे का?

कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे शेअर्स विकण्यास मदत करणारे इक्विटिजेनचे फिल हॅझलेट सांगतात की, या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत स्टार्टअप शेअर्स विकणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. अलीकडच्या काही महिन्यांत काही युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या शेअरच्या किमती ४४ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. गेल्या दहा वर्षांतील टेक मार्केटमधील हा सर्वात मोठा गोंधळ आहे. आयपीओ बाजार आपली चमक गमावत आहे आणि व्हेंचर फंडिंगलाही मोठा फटका बसला आहे.

आणि गेल्या उन्हाळ्यात किंचित घट झाल्यापासून वाढत होती त्या क्रिप्टोकरन्सीबद्दल काय? सर्वात स्थिर मानल्या जाणाऱ्या बिटकॉइनने गेल्या नोव्हेंबरमध्ये ६८,००० डाॅलरचा डोंगर चढला होता, परंतु आता तो २८,६०० डाॅलरच्या गर्तेत घसरला आहे. काॅइनबेस या क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मलादेखील खूप नुकसान सोसावे लागले आणि आता ते ६० टक्क्यांनी खाली आले आहे. बाजारावर बारीक नजर ठेवणारे व्हेंचर कॅपटलिस्ट बिल गुर्ले म्हणतात, “गेल्या १३ वर्षांच्या आश्चर्यकारक मार्केट-रनमुळे निर्माण झालेल्या उद्योजक आणि तंत्रज्ञान गुंतवणूकदारांच्या संपूर्ण पिढीची उज्ज्वल दृष्टी आता कटू वास्तवाला सामोरी जात आहे.’

सध्या, तंत्रज्ञान उद्योगासाठी काहीही चांगले घडत नाही. १३ वर्षांपासून करत असलेल्या सर्वांगीण विकासाच्या मंत्राचा जप शांतपणे बसणे त्यांच्यासाठी चांगले होईल. उबेरचे सीईओ दारा खोसरोवशाही यांनी या आठवड्यात कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, ‘आम्हाला आमच्या किमतींबाबत अधिक कठोर व्हायला हवे.’ आपण जाणतो की, प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते! (द न्यूयॉर्क टाइम्समधून)

कारा स्विशेर ज्येष्ठ अमेरिकन पत्रकार आणि द न्यूयाॅर्क टाइम्सच्या स्तंभलेखक