आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Twitter Logo, Named After A Basketball Player, Once Excluded The Founders

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - इलॉन मस्क:बास्केटबॉल खेळाडूच्या नावावर ट्विटर लोगो, एकदा संस्थापकांनाही वगळले होते

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१४ एप्रिल २०२२ रोजी इलॉन मस्क यांनी ४३ अब्ज डाॅलरला ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली, नंतर बोली मागे घेतली, नंतर पुन्हा बोली लावली. मस्क यांनी अधिकृतपणे २७ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्विटर विकत घेतले.

स्थापना ः २६ जुलै २००६ संस्थापक ः जॅक डोर्सी, इव्हान विल्यम्स, बेज स्टोन आणि नोआ ग्लास मुख्यालय ः कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका बाजारमूल्य ः ३ लाख कोटी रु.

ट्विटरचा प्रवास २००६ : २५ जुलै २००६ रोजी ट्विटरची सुरुवात झाली २००७ : ट्विटरने १ लाख डॉलरचा पहिला निधी मिळवला २००९ : ब्ल्यू टिकची सुरुवात २०११ : १० कोटी युजर्स झाले २०१२ : कंपनीचा लोगो बदलून निळी चिमणी केला २०१३ : ३१ अब्ज डॉलर मूल्यांकनासह आयपीओ जारी २०१८ : ट्विटरने शब्दसंख्या १४० वरून २८० केली

इलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डाॅलर किंवा ३.३६ लाख कोटी रुपयांना विकत घेतले. कंपनीची सूत्रे हाती घेताच त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह प्रमुख चार अधिकाऱ्यांना कंपनीतून बडतर्फ केले आहे. कंपनीचे मार्केट कॅप ३ लाख कोटी आहे आणि दैनंदिन वापरकर्त्यांची संख्या सुमारे २३ कोटी ७० लाख आहे. ट्विटर १६ वर्षांपूर्वी २००६ मध्ये सुरू झाले. त्याच्या निर्मितीमागे एक मनोरंजक कथा आहे. खरं तर जॅक डोर्सी आणि नोआ ग्लास ओडिओ या पॉडकास्ट निर्मात्या कंपनीशी संबंधित होते, ग्लास ऑडिओचे सहसंस्थापक होते आणि जॅक तिथे कर्मचारी होते. सॅन फ्रान्सिस्कोमधील एका पबमध्ये एका रात्री एकत्र ड्रिंक घेतल्यानंतर जॅक यांनी नोआला ट्विटरची कल्पना सांगितली. नोआला ही कल्पना आवडली. दोघांनी ही कल्पना ओडिओ कंपनीचे दुसरे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांना सांगितली. विल्यम्स सुरुवातीला संकोचत होते, पण नंतर समेट झाला. याशिवाय बिझ स्टोन नावाच्या व्यक्तीनेदेखील ट्विटरचे सहसंस्थापक होण्यासाठी स्वारस्य व्यक्त केले आणि शेवटी या ४ संस्थापकांच्या मदतीने १५ जुलै २००६ रोजी ट्विटर अधिकृतपणे सुरू करण्यात आले.

ट्विटर कंपनीच्या माजी सीईओंबद्दल जाणून घ्या जॅक डोर्सी २००६-०८ व २०१५-२१ जॅक २००६ मध्ये ट्विटरचे सीईओ झाले. ट्विटरची स्थापना झाल्यावर अवघ्या २ वर्षांनी त्यांना काढून टाकण्यात आले. २००८ मध्ये कंपनी सोडल्यावर ७ वर्षांनी ते कंपनीत सीईओ म्हणून परत आले, २०२१ मध्ये त्यांनी सीईओ पदाचा आणि २०२२ मध्ये ट्विटर बोर्डाचाही राजीनामा दिला. जॅक डोर्सींची एकूण संपत्ती ३६,७५० कोटी रुपये आहे.

इव्हान विल्यम्स २००८ ते २०१० इव्हान ट्विटरच्या संस्थापकांपैकी एक होते, त्यांच्याकडे सर्वाधिक शेअर्स होते. विल्यम्स हे नाओ ग्लास व जॅक डोर्सी ट्विटरमधून बाहेर पडण्याचे मुख्य कारण होते. २००८-१० दरम्यान ते सीईओ झाले. २०१९ मध्ये त्यांनी बोर्ड सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. इव्हान यांची एकूण संपत्ती १४ हजार ९०० कोटी रुपये आहे.

पराग अग्रवाल २०२१-२०२२ पराग २०११ मध्ये इंजिनिअर म्हणून ट्विटरमध्ये रुजू झाले. २०१७ मध्ये ते ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, २०२१ मध्ये ट्विटरचे सीईओ झाले. त्यानंतर मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले. ट्विटर सोडल्याबद्दल पराग यांना ४७५ कोटी रु. मिळतील. पराग यांची संपत्ती १२१८ कोटी रु. आहे.

रंजक ः अंतराळात ट्विटर {जॅक डोर्सी यांनी २१ मार्च २००६ रोजी ट्विटरवर पहिले ट्विट केले होते, ते १५ वर्षांनी लिलावात सुमारे १८ कोटींना विकले गेले. {२२ जानेवारी २०१० रोजी पृथ्वीच्या बाहेरूनही एक ट्विट करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीराने ते केले. {ट्विटरचा लोगो लॅरी बर्ड या प्रसिद्ध बास्केटबॉलपटूच्या नावावर आहे.

वाद ः डेटाच्या गैरवापराचा आरोप {ट्विटरला युजर्सच्या डेटाचा गैरवापर केल्याबद्दल १२०० कोटी रुपये दंड भरावा लागला. {नवीन आयटी नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. {ट्विटरच्या माजी सुरक्षा प्रमुखांनी ट्विटरवर कमकुवत सुरक्षा आणि स्पॅमबद्दल नियामकाची दिशाभूल केल्याचा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...